![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/08/India-Pakistan-Partition-380x214.jpg)
भारत सरकारने नुकतेच जाहीर केले की, 14 ऑगस्ट हा दिवस 'फाळणी भय स्मृती दिन' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून साजरा केला जाईल. फाळणी आणि भारताचे स्वातंत्र्य याला आता 75 वर्षे झाली. भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. इतकी वर्षे लोटूनही अनेकांच्या मनात भारत-पाकिस्तान फाळणी (India-Pakistan Partition) झाल्याची सल कायम आहे. अर्थात आता त्याला फारसा अर्थ उरला नाही. कारण फाळणीने भारत आणि पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्र जन्माला घातली. आता जगाच्या नकाशावर कायमच ही दोन राष्ट्रे दिसणार आहेत. त्याला पर्याय नाही. दरम्यान, भारत-पाकिस्तान फाळणी (Partition) झाली तेव्हा नेमके काय घडले यांचे अनेक दाखले इतिहासाच्या पुस्तकात पाहायला मिळतात. आजकाल इंटरनेटवरही अधिक अचूक माहिती देऊ पाहणाऱ्या संकेतस्थळांवरही आकडेवारीसह तपशीलाने माहिती उपलब्ध आहे.
फाळणी आणि बिजे
देशाची फाळणी जरी 1947 मध्ये झाली असली तरी, त्याची बिजे आधीच काही वर्षे रोवली गेली होती. स्वातंत्र्यपूर्व भारतात हिंदु बहुसंख्य होते. तेव्हाही मुस्लिम अल्पसंख्याकच होते. त्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही सर्वात मोठी राजकीय संस्था होती. परंतू, त्या काळातील भारतातील काही मुस्लिमांचे म्हणने होते की, मुस्लिमांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संस्था (काँग्रेस) फारशी प्रभावी नाही. या विचारातून ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीग पक्षाची स्थापना 1906 मध्ये झाली. अल्लामा इक्बाल यांनी ही संस्था स्थापन केली. याच काळात हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही वेगवेगळे प्रवाह आहेत. त्यामुळे महंमत अली जीना यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. अमेरिका आणि कॅनडा यांच्या प्रमाणे नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्रांमधील संबध हे परस्पर सहकार्याचे असतील असेही जीना यांनी म्हटले. मात्र, काँग्रेस पक्षातील नेत्यांचा या सिद्धांतास ठाम विरोध होता. परंतू, तेव्हा 'थेट कृतिदिन' (Direct Action Day) च्या रुपात द्विराष्ट्रवादाचा मुद्दा पुढे रेठण्यात आला. त्या वेळी जवळपास 5000 लोक मारले गेल्याचे सांगितले जाते. (Happy Independence Day 2021 Messages: खास Quotes, Wishes, Images, WhatsApp Status शेअर करून साजरा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन)
प्रत्यक्ष फाळणी
लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या योजनेखाली भारताची प्रत्यक्ष फाळणी पार पडली. त्यानुसार इंग्रज सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या अधिकाऱ्याने दोन्ही देशांची (भारत-पाकिस्तान) प्रत्यक्ष सीमा आखून दिली. त्यानंतर इंग्लंडच्या संसदेत 18 जुलै 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य देत असल्याचा कायदा मंजूर करण्यात आला. या वेळी भारतात संस्थाने अस्तित्वात होती. या संस्थानांची संख्या 565 इतकी होती. या संस्थांना भारतात सहभागी व्हायचे किंवा नाही याचा अधिकार देण्यात आला. इंग्रजांच्या कायद्यातील या तरतुदींमुळे कश्मीर, जुनागड आणि हैदराबाद संस्थानांनी समस्या निर्माण केली.
फाळणी नंतर काय घडले?
भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली झाल्या. त्या काळात सुमारे 1.45 कोटी जनता फाळणीच्या निर्णयामुळे प्रभावीत झाली. या वेळी उफाळलेल्या हिंसाचारात सुमारे 10 लाख लोकांचे प्राण गेले असा अंदाजित आकडा सांगितला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, हिंसाचार झाले तरीही पाकिस्तानात काही हिंदू कुटुंबे कायम राहिली. भारतातही त्या वेळच्या एकूण मुस्लिमांपैकी 1/3 मुस्लिम समाज भारतात राहिला. फाळणीनंतर भाषा, समाजरचना, सीमा, असे अनेकही प्रश्न निर्माण झाला.