Pani Puri Samples Fail to Meet Quality: आजकाल घरात बनवलेल्या पदार्थांशिवाय बाहेरचे काहीच आरोग्यदायी नसल्याचे दिसत आहे. याआधी कर्नाटकमध्ये (Karnataka) गोळा केलेल्या 17 शोरमा नमुन्यांपैकी अनेक नमुने आरोग्यदायी नसल्याचे दिसून आले होते. आता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना कर्नाटकातील पाणीपुरीच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर धक्कादायक निष्कर्ष आढळले. कर्नाटकात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणला (FSSAI) आढळून आले आहे की, राज्यात विकले जाणारे पाणीपुरीचे (Pani Puri) सुमारे 22% नमुने गुणवत्ता मानकांची पूर्तता करत नाहीत.
राज्यभरातून संकलित केलेल्या पाणीपुरीच्या 260 नमुन्यांपैकी 41 नमुने असुरक्षित घोषित करण्यात आले, कारण त्यात कृत्रिम रंग आणि कर्करोगास कारणीभूत घटक आढळले. इतर 18 निकृष्ट दर्जाचे मानले गेले, ज्यामुळे ते खाण्यासाठी अयोग्य होते.
डीएचशी बोलताना अन्न सुरक्षा आयुक्त श्रीनिवास के. याला पुष्टी दिली आणि प्राधिकरणाकडे अनेक तक्रारी आल्यानंतर पाणीपुरीचा दर्जा तपासण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. श्रीनिवास म्हणाले, हा सर्वात जास्त मागणी असलेल्या चाट पदार्थांपैकी एक असल्याने, आम्हाला त्याच्या तयारीत गुणवत्तेशी संबंधित अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयांपासून ते सुप्रसिद्ध रेस्टॉरंटपर्यंत, राज्यभरातील दुकानांच्या प्रत्येक श्रेणीतून नमुने गोळा केले. चाचणीच्या निकालांवरून असे दिसून आले की, मोठ्या संख्येने नमुने खाण्यासाठी अयोग्य होते. परिणामांवरून असे दिसून आले की भोजनालयांनी यामध्ये रसायने आणि कृत्रिम रंगद्रव्ये वापरली होती.
डॉ विशाल राव, शैक्षणिक संशोधन केंद्र, एचसीजी कॅन्सर सेंटर, डीएच यांना सांगितले की, या कृत्रिम रंगांचे आरोग्यावर विविध परिणाम होऊ शकतात. साध्या पोटदुखीपासून ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांपर्यंत या कृत्रिम रंगांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यातील काही रंगांमुळे स्वयंप्रतिकार रोग किंवा मूत्रपिंडाचे नुकसान देखील होऊ शकते. (हेही वाचा: Nanded Shocker: नांदेड येथे दूषित पाणी पिल्याने 93 लोक रुग्णालयात दाखल, विहीर करण्यात आली सील)
अन्न सुरक्षा अधिकारी आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध संभाव्य उपाययोजना आणि लहान भोजनालयांमध्ये अन्न सुरक्षा मानकांची अंमलबजावणी कशी केली जाऊ शकते याबाबत अभ्यास करत आहेत. या रसायनांचा प्रभाव समजून घेण्यासाठी परिणामांचे विश्लेषण केले जात आहे. अलीकडेच, एफएसएसएआय, कर्नाटकने कबाब, कोबी मंचुरियन आणि कॉटन कँडीमध्ये कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घातली होती.