
Nanded Shocker: नांदेड जिल्ह्यातील मुगाव तांडा गावात विहिरीचे दूषित पाणी पिल्याने सुमारे 93 जणांची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. गावातील लहान मुलांसह वृद्धांना पिण्याच्या पाण्यामुळे संसर्ग झाला आहे. पीटीआयला माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे म्हणाले की, २६ आणि २७ जून रोजी लोकांनी पोटदुखी आणि मळमळ होत असल्याची तक्रार केली होती. गावातील ९३ लोकांनी अशीच तक्रार केली. एकाच वेळी अनेक जण आजारी पडल्याने ग्रामस्थांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुगाव येथे ५६ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर ३७ रुग्णांना मांजरमला पाठवण्यात आले. जे बरे झाले आहेत त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.