Birubala Rabha Dies: बिरुबाला राभा यांचे निधन; असममध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर करण्यात होती महत्त्वाची भूमिका; घ्या जाणून
Birubala Rabha | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अंधश्रद्धा आणि जादूटोणा (Assam's Anti-Witch Hunting Law) याविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि त्याबाबत असम राज्यात कायदा मंजूर व्हावा यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या विरुबाला राभा यांचे निधन (Birubala Rabha Passes Away) झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. प्रदीर्घ काळ कर्करोगाशी लढा दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 22 एप्रिलपासून राज्य कर्करोग संस्थेच्या गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (GMCH) गंभीर अशक्तपणामुळे उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे माहिती GMCH अधीक्षक अभिजित सरमा यांनी म्हटले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी आणि इतर नातेवाईक आहेत.

प्रदीर्घ काळ कर्करोगाशी लढा

आसाममधील जादूटोणाविरुद्धच्या अथक लढ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या बिरुबाला राभा यांचे निधन झले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. प्रदीर्घ काळ कर्करोगाशी लढा दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 22 एप्रिलपासून राज्य कर्करोग संस्थेच्या गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (GMCH) गंभीर अशक्तपणामुळे उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच सोमवारी सकाळी 9:23 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे माहिती GMCH अधीक्षक अभिजित सरमा यांनी म्हटले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी आणि इतर नातेवाईक आहेत. (हेही वाचा, Sushil Kumar Modi Passes Away: बिहार चे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन)

जादूटोणाविरोधात प्रतिबंध कायद्यासाठी

असममधील ममधील गोलपारा जिल्ह्यातील ठाकुरविला गावातील रहिवासी असलेल्या बिरुबाला राभा यांना त्यांच्या कार्याबद्दल 2021 मध्ये प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आसाम सरकारने अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधात कडक प्रतिबंध आणि संरक्षण कायदा, 2015 लागू करावा यासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. त्या वकीलसुद्धा होत्या राभा यांची वकिली कायदेविषयक सुधारणांच्या पलीकडे विस्तारली. 2011 मध्ये, तिने मिशन बिरुबाला या एनजीओची स्थापना केली, जी डायन-हंटिंगबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि वाचलेल्यांना आणि संभाव्य पीडितांना मदत करण्यासाठी समर्पित आहे.

राभा निधनानंतर अनेकांन दु:ख व्यक्त केले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राभांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. तसेच, सामाजिक दुष्कृत्यांचा सामना करण्यासाठी आणि उपेक्षित समुदायांना सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक करत त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. राभा यांच्यावर त्यांचे मूळ गाव गोलपरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या कार्याने अमीट ठसा उमटवल्याची भावना असमच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने राज्यातील पुरोगामी वर्तुळाला धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, त्यांचे कार्य पुढेही सुरु राहिल असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.