SP Balasubramanyam and Shinzo Abe (Photo Credits: Twitter)

प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून प्रदान केला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणाऱ्या 'पद्म पुरस्कारां'ची (Padma Awards) घोषणा करण्यात आली आहे. 1954 पासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती. या पुरस्कारांना पद्म विभूषण (Padma Vibhushan), पद्मभूषण (Padma Bhushan) आणि पद्मश्री (Padma Shri) अशा तीन प्रकारात विभागले गेले आहे. अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी सात जणांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, गायक एस पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर) यांचा समावेश आहे.

सात लोकांना पद्मविभूषण, दहा जणांना पद्मभूषण आणि 102 व्यक्तींना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. (हेही वाचा: Indian Railways: आतापासून दर दिवसा रेल्वे रुळावर धावणार 1138 एक्सप्रेस- रेल्वे मंत्रालय)

पद्म विभूषणने सन्मानित –

  • श्री शिन्झो आबे (Shinzo Abe) - सार्वजनिक व्यवहार- जपान
  • श्री एस पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर) (S P Balasubramaniam) - कला- तमिळनाडू
  • डॉ. बेले मोनप्पा हेगडे (Dr. Belle Monappa Hegde) - औषध- कर्नाटक
  • श्री नरिंदरसिंग कपनी (मरणोत्तर) (Narinder Singh Kapany) - विज्ञान आणि अभियांत्रिकी- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
  • मौलाना वहीदुद्दीन खान (Maulana Wahiduddin Khan) - इतर- अध्यात्म- दिल्ली
  • श्री बी. बी. लाल (B. B. Lal)- इतर- पुरातत्व-दिल्ली
  • श्री सुदर्शन साहू (Sudarshan Sahoo) - कला- ओडिशा

    पद्मभूषणने सन्मानित- 

    • कृष्णन नायर शांताकुमारी चिथरा, कला
    • तरुण गोगोई, सार्वजनिक क्षेत्र (मरणोत्तर)
    • चंद्रशेखर कंबारा, साहित्य आणि शिक्षण
    • सुमित्रा महाजन, सार्वजनिक क्षेत्र
    • नृपेंद्र मिश्रा, नागरी सेवा
    • रामविलास पासवान, सार्वनिज क्षेत्र (मरणोत्तर)
    • केशुभाई पटेल, सार्वजनिक क्षेत्र (मरणोत्तर)
    • कल्बे सादिक, आध्यात्मिक (मरणोत्तर)
    • रजनिकांत देविदास श्राॉफ, व्यापार आणि उद्योग
    • तरलोचन सिंग, सार्वजनिक क्षेत्र

दरम्यान, भारतरत्न पुरस्कारानंतरचे पद्म पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात. राजकारण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना केंद्र सरकारतर्फे गौरवण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर केंद्रीय गृहमंत्रालयाने विशिष्ट क्षेत्रात/ शिस्त, शौर्य अपवादात्मक कामगिरीबाबत पुरस्कारासाठी निवडल्या गेलेले पोलिस अधिकारी, संरक्षण कर्मचारी आणि मुलांची एक यादी प्रसिद्ध केली. या पुरस्कारांमध्ये पद्म पुरस्कार, शौर्य पुरस्कार, राष्ट्रपती पोलिस पदक, सुधारात्मक सेवा पुरस्कार, पंतप्रधान चाइल्ड अवॉर्ड, राष्ट्रपति अग्निशमन पदक, गृह रक्षक आणि नागरी संरक्षण सन्मान आणि जीवन रक्षा पदक यांचा समावेश आहे.