A representational image. | (Image Credits: Facebook)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळात अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र अनलॉकच्या टप्प्यात आवश्यक ती खबरदारी घेत हळूहळू लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यात आल्या. त्यात आता रेल्वे मंत्रालयाकडून (Railway Ministry of India) आलेल्या नव्या माहितीनुसार, आतापासून दर दिवसा 1138 मेल/एक्सप्रेस (Express) रेल्वे रुळांवर धावणार आहेत. यात फेस्टिवल रेल्वेचाही (Festival Express) समावेश आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित योग्य त्या नियमांचे पालन करत ह्या रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या झोन्समध्ये हा गाड्या सुरु होणार आहेत.

सद्य स्थितीत दर दिवसा एकूण 4,807 उपनगरी रेल्वे सेवा कार्यरत आहेत अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.हेदेखील वाचा- मुंबई: बोरीवली, मालाड सांताक्रूज रेल्वे स्टेशन्स चे पालटले रुप, स्थानकांवर रेखाटण्यात आली सुंदर चित्रे, See Pics

दरम्यान लखनऊ-नवी दिल्ली (82501/82502) तेजस एक्सप्रेस 23 नोव्हेंबरपासून तर अहमदाबाद-मुंबई (82901/82902) तेजस एक्सप्रेस 24 नोव्हेंबरपासून रद्द केली आहे. या रेल्वे इतर रेल्वेमधील प्रवाशांची संख्या पाहता नंतर सुरु करण्यात येतील असे IRCTC कडून सांगण्यात येत आहे. दरम्यान या रेल्वेने प्रवास करु इच्छिणा-या या गोष्टीची माहिती घेऊन त्यानुसार आपला प्रवास योजावा असेही सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या लसीमुळे कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र नव्या स्ट्रेनचा धोका रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे आणखी बळावू नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.