व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे चालवल्या जाणाऱ्या ऑनलाईन क्लासेस (Online Classes Fraud) द्वारा एका नागरिकाची तब्बल 64 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. ही घटना दिल्ली येथील विशालाक्षी नगर येथे घडली. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) पीडित व्यक्तीची ओळख अद्याप उघड केली नाही. मात्र, त्याने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. गुन्हाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीडिताला स्टॉक मार्केटमध्ये अधिक नफा मिळविण्यासाठी ऑनलाईन क्लास लावण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्याला "स्टॉक एक्सचेंज" नावाच्या फसव्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर हा घोटाळा घडला.
गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष
आरोपींनी पीडिताला सांगितले की, त्याला ऑनलाईन क्लसच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि टीप्स दिल्या जातील. ज्यामुळे तो स्टॉक गुतवणुकीच्या क्षेत्रात अधिक नफा मिळवले. अधिक लाभाच्या आमिशाने पीडिताने आरोपींवर विश्वास ठेवला. कालांतराने, गुंतवणुकीच्या आशादायक संधींच्या नावाखाली, घोटाळेबाजांच्या सांगण्यावरून विविध डिजिटल प्लॅटफॉर्म आणि बँकिंग चॅनेलवर 64 लाख रुपयांची भरीव रक्कम जमा करण्यात आली. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, कालांतराने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने पीडितेला फसवणूक आणि परतावा न मिळण्याची शक्यता लक्षात आली. त्यामुळे त्याने थेट पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि तक्रार दिली. (हेही वाचा, ‘Chakshu’ And ‘DIP’ Platforms: 'चक्षु' आणि 'डीआयपी' पोर्टल आहे तरी काय? सायबर फसवणूक टाळण्यासाठी घ्या जाणून )
पोलिसांकडन सावधगिरीचे अवाहन
पीडिताने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला. पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केलयाचे वृत्त आहे. पोलिसांनी सांगीतले की, अपरिचित ऑनलाइन गट किंवा गुंतवणूक योजनांमध्ये सामील होण्यासाठी अपरिचित संदेश किंवा आमंत्रणे येतात तेव्हा दक्षता आणि सावधगिरी बाळगणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही पूर्वमाहिती नसताना अपरिचीत व्हॉट्सअॅप ग्रुप, संदेश यांच्यावर विश्वास ठेऊ नये. (हेही वाचा, Investment Scam: गुंतवणूक घोटाळा; 73 वर्षीय उद्योजकाची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक; कापड कारखाना मालकास अटक)
ऑनलाइन फसवणूक म्हणजे काय?
ऑनलाइन फसवणूक म्हणजे इंटरनेट किंवा डिजिटल चॅनेलद्वारे होणाऱ्या फसव्या क्रियाकलापांचा संदर्भ. यामध्ये व्यक्ती किंवा संस्थांकडून बेकायदेशीरपणे वैयक्तिक, आर्थिक किंवा संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी फसवणूक, फेरफार किंवा चुकीचे सादरीकरण यांचा समावेश आहे. ऑनलाइन फसवणूक विविध प्रकारची असू शकते आणि व्यक्ती, व्यवसाय किंवा सरकारी संस्थांना लक्ष्य करू शकते. ऑनलाइन फसवणुकीच्या काही सामान्य प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे:
एकंदरीत, ऑनलाइन फसवणूक व्यक्ती, व्यवसाय आणि सरकार यांच्यासाठी महत्त्वपूर्ण जोखीम दर्शवते. जसजसे तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि डिजिटल व्यवहार अधिक सामान्य होत आहेत, तसतसे ऑनलाइन फसवणूकीपासून संरक्षण करण्यासाठी सतर्क राहणे आणि सक्रिय उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करणे, सुरक्षित पासवर्ड वापरणे, आर्थिक खात्यांचे नियमितपणे निरीक्षण करणे आणि सामान्य फसवणूक योजना आणि सायबर सुरक्षा सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहिती ठेवणे यांचा समावेश होतो.