Cyclone Fani:ओडिशात(Odisha) हाहाकार माजवलेल्या फनी वादळाचा सर्वाधिक फटका बसला तो, येथील पूरी (Puri) रेल्वे स्थानकाला. ह्या वादळामुळे हे रेल्वेस्थानक (Railway Station) पुर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, पूरी स्थानकाशी नागरिकांचा संपर्क पुर्णपणे तुटला आहे. ह्या पूरी रेल्वेस्थानकाच्या दुरुस्तीसाठी आपल्याला 3 महिन्यांचा कालावधी लागेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहेत. तथापि, येत्या 12 मे पासून येथील सामान्य रेल्वे सेवा सुरु करण्यात येईल असेही ते म्हणाले.
3 मे ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलेल्या आणि थैमान घातलेल्या झंझावती 'फनी' चक्रीवादळाने आतापर्यंत 16 लोकांचा बळी घेतला आहे. ह्या फनी वादळात 175 किलोमीटर ताशी वेगाने हवेचा वेग होता. ह्या वादळाने ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या(Andhra Pradesh) 18 जिल्ह्यांमध्ये अक्षरश: थैमान घातले.
राज्यात 3 मे ला आलेल्या ह्या फनी वादळाने 595 रेल्वे रद्द केल्या होत्या. त्यात आतापर्यंत केवळ 141 रेल्वे पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. ह्यात भुवनेश्वरवरुन(Bhuvneshwar) सुरु होणा-या 34 रेल्वेंचाही समावेश आहे.
'फनी' म्हणजे काय?
'फनी' चक्रीवादळाचं नाव बांग्लादेश कडून सुचवण्यात आलेल्या नावामधील आहे. त्याचा उच्चर 'फोनी' असा होतो. तर त्याचा अर्थ 'साप' आहे.
Fani Cyclone: 'ओडिशा' ला धडकणारं चक्रीवादळ 'फनी' याचं नावं कसं ठरलं? त्याचा नेमका अर्थ काय?
चक्रीवादळाला कसं दिलं जातं नावं?
# वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन (World Meteorological Organisation) ने आशिया खंडातील चक्रीवादळांना नाव देण्याची पद्धत 2000 सालपासून सुरू केली. हिंद महासागरातील वादळांना नावं देण्यासाठी भारत, बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या 8 देशांचा समावेश करण्यात आला आहे.
# प्रत्येक देशाकडून 8 नावं सुचवली जातात. अशाप्रकारे 64 नावांची यादी तयार केली जाते.
# वार्याचा वेग 74 मिली प्रति तासाहून अधिक वेगाने असल्यास, त्याचा चक्रीवादळ असा उल्लेख केला जातो. त्यानंतर 64 नावांच्या यादीमधून एक नाव निवडलं जातं.