Fani Cyclone: 'ओडिशा' ला धडकणारं चक्रीवादळ 'फनी' याचं नावं कसं ठरलं? त्याचा नेमका अर्थ काय?
Cyclone in Odisha (Photo credit: IANS)

Odisha Cyclone Fani: आज ओडिशाच्या (Odisha) किनार्‍यावर 'फनी' चक्रीवादळाचा (Cyclone Fani) तडाखा बसणार आहे. सध्या सुमारे 180 किमी प्रति तास या वेगाने वादळ पुढे सरकत आहे. वार्‍याचा तुफान वेग आणि पावसाचा अंदाज असल्याने सुमारे 11 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहेत. 'फनी' चक्रीवादाळाचा प्रभाव आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल येथेही बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण प्रत्येक मोठ्या वादळाला एक विशिष्ट नावं दिलं जातं. त्यानुसार आज धडकणारं 'फनी' वादळ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. Cyclone Fani: फनी चक्रीवादळ ओडिशा राज्याच्या सीमेवर, गृह मंत्रालयाकडून 1938 हेल्पलाइन क्रमांक जारी

'फनी' म्हणजे काय?

'फनी' चक्रीवादळाचं नाव बांग्लादेश कडून सुचवण्यात आलेल्या नावामधील आहे. त्याचा उच्चर 'फोनी' असा होतो. तर त्याचा अर्थ 'साप' आहे.

चक्रीवादळाला कसं दिलं जातं नावं?

# वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन (World Meteorological Organisation) ने आशिया खंडातील चक्रीवादळांना नाव देण्याची पद्धत 2000 सालपासून सुरू केली. हिंद महासागरातील वादळांना नावं देण्यासाठी भारत, बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या 8 देशांचा समावेश करण्यात आला आहे.

# प्रत्येक देशाकडून 8 नावं सुचवली जातात. अशाप्रकारे 64 नावांची यादी तयार केली जाते.

# वार्‍याचा वेग 74 मिली प्रति तासाहून अधिक वेगाने असल्यास, त्याचा चक्रीवादळ असा उल्लेख केला जातो. त्यानंतर 64 नावांच्या यादीमधून एक नाव निवडलं जातं.

cyclone name List
photo credits : public.wmo.int

केरळमध्ये धडकलेल्या 'ओखी' वादळाला बांग्लादेशने नाव सुचवलेले होते. मागील वर्षी तितली या आंध्रप्रदेशातील चक्रीवादळाला पाकिस्तानने सूचवलेले नाव देण्यात आलं होतं.