Cyclone Fani: फनी चक्रीवादळ ओडिशा राज्याच्या सीमेवर, गृह मंत्रालयाकडून 1938 हा हेल्पलाइन क्रमांक जारी
Cyclone Fani (Photo Credits: IANS)

फनी चक्रीवादळाचा (Cyclone Fani) तडाखा आज ओडिशाच्या किनार्‍यावर (Odisha Coast ) बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज दुपारपर्यंत हे वादळ धडकणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाच्या ( India Meteorological Department) अंदाजानुसार आज दहा वाजेपर्यंत पुरी (Puri) शहरात धडकेल. त्याचा परिणाम आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांनाही बसणार आहे.ओडिशाच्या गोपालपूरपासून हे चक्रीवादळ 65 किलोमीटर अंतरावर तर पुरीपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. Fani Cyclone: 'ओडिशा' ला धडकणारं चक्रीवादळ 'फनी' याचं नावं कसं ठरलं? त्याचा नेमका अर्थ काय?

ANI ट्विट

फनी वादळाच्या धोक्यामुळे भुवनेश्वर, कोलकत्ता विमानळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुमारे 11 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी दीघापासून 50 बस सोडण्यात आल्या आहेत. तर 200 हून अधिक लांब पल्ल्याच्या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक 1938 जारी करण्यात आला आहे. पाऊस आणि जोरदार वार्‍याचा धोका पाहता समुद्रकिनारे रिकामे करण्यात आले आहेत. एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.