Nirbhaya Rape Case:  आरोपी 'पवन कुमार गुप्ता' ची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; वकिलाला देखील 25 हजारांचा दंड
दिल्ली उच्च न्यायालय । Photo Credits: PTI

दिल्लीसह देशाला हादरवणार्‍या निर्भया बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी अक्षय सिंह पाठोपाठ आता पवन कुमार गुप्ता याची देखील याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. गुन्हा झाला तेव्हा आरोपी पवन कुमार गुप्ता हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या याचिकेमध्ये करण्यात आला होता. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. ऑसिफिकेशन टेस्ट झाली नसल्याचं सांगत त्याचा फायदा मिळायला हवा असं सांगत शिक्षेपासून दूर राहण्यासाठी अशाप्रकारचा दावा केला जात असल्याचं सांगत निर्भयाच्या आईनेही यावर आक्षेप घेतला होता. दरम्यान पवनचे वकील ए. पी. सिंग यांनी कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी 25 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. Nirbhaya Rape Case: सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली; आरोपी अक्षय सिंह याची फाशी कायम

दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने बार कॉऊंसिलकडे पवनचे वकील ए.पी सिंह यांच्याविरूद्ध तक्रार केली आहे. त्यांना दंड ठोठावला आहे. पवनच्या वयाबद्दल माहिती देताना खोटी कागदपत्र, अ‍ॅफिडेव्हिट दिल्याप्रकरणी त्यांच्यावरही कारवाईचे आदेश आहेत.

ANI Tweet

दरम्यान अ‍ॅसिफिकेशन टेस्टच्या माहितीनुसार, हाडांच्या घनतेवरून मनुष्याच्या वयाची माहिती मिळते. आरोपी अल्पवयीन आहे की नाही? हे समजण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची भूमिका बजाबवते.