Nirbhaya Rape Case: सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली; आरोपी अक्षय सिंह याची फाशी कायम
The Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

दिल्ली (Delhi) येथील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी (Nirbhaya Case) सर्वोच्च न्यायालयाने दोषी अक्षय कुमार सिंह (Akshay Kumar Singh) याला फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. बुधवारी तीन सदस्यांच्या खंडपीठाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. अक्षयचे वकील एपी सिंह यांनी सुनावणीच्या वेळी खटल्याच्या तपासणी आणि पीडितेच्या विधानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. ए.पी सिंह म्हणाले की, पीडितेने शेवटच्या वक्तव्यात अक्षय किंवा कोणत्याही दोषीचे नाव घेतले नाही. एका ड्रग ओव्हरडोजमुळे पीडितेचा मृत्यू झाला आहे. मीडिया आणि राजकीय दबावाखाली अक्षयला शिक्षा झाली होती. तो निर्दोष आणि गरीब आहे. भारत अहिंसेचा देश आहे आणि फाशी देणे हा मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्णयामध्ये काय उणीव आहे? आणि का याचा पुनर्विचार करावा? यासाठी तुम्ही आपल्याकडे ठोस पुरावे आणि कायदेशीर तथ्ये ठेवावीत.

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातला आरोपी अक्षय कुमार सिंह याने सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी करण्यात आली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ याचिकेवर सुनावणी करणार होते. परंतु, त्यांनी या सुनावणीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीने फाशीच्या शिक्षेवर पुर्नविचार करण्याचे याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयातील 3 सदस्यांच्या खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली आहे. हे देखील वाचा- Nirbhaya Case Hearing: सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी ऐन सुनावणीच्या दिवशी का घेतली माघार? वाचा सविस्तर

एएनआयचे ट्वीट-

धक्कादायक म्हणजे, 16 डिसेंबर 2012 रोजी एका तरुणीवर धावत्या बसमध्ये बलात्कार करुन तिला पूर्णपणे खजमी करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपीला अटक केली होती. त्यामुळे संबधित पीडितेने 29 डिसेंबर रोजी सिंगापूर येथील माउन्ट एलिझाबेथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता.