| Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

डीजिटल मीडियाचा (Digital Media) भाग असलेल्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स (Social Media Platform) आणि नेटफ्लिकस (Netflix), अमेजन प्राइम (Amazon Prime), हॉटस्टार (Hotstar) यांसारख्या प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नवे कायदे आणि नियम जारी करत आहे. आगामी काही काळातच हे नियम डीजिटल माध्यमांसाठी लागू होतील. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी (25 फेब्रुवारी) एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली, या वेळी ही माहिती देण्यात आली.

पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद यांनी सांगितलेकी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स भारतात व्यापार करु शकतो. भारतात त्यांचे स्वागत आहे. परंतू, सोशल मीडियाच्या माध्यमातून अभद्रता, अश्लिलताही पसरवली जात आहे. (हेही वाचा, Telegram App जगात होतंय सर्वाधिक डाऊनलोड, WhatsApp ला दणका; TikTok, Signal ने फेसबुकला टाकले मागे)

सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कशी असेल नियमावली?

  • आक्षेपार्ह कंटेट सर्वात पहिल्यांदा कोणी शेअर, अथवा पोस्ट केला याची माहिती सरकार आणि न्यायालयाने मागितल्यास देणे बंधणकारक असेल.
  • तक्रार निवारण अधिकाऱ्याची निवड करण्यात येईल. हा अधिकारी भारतातच असणे आवश्यक आहे. प्रत्येक सोशल मीडिया कंपनीला आपल्याकडे किती तक्रारी आल्या आणि त्याचे कोणत्या पद्धतीने निवारण करण्यात आले याचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे.
  • सोशल मडियासाठी तीन पद्धतीच्या श्रेणी असतील. U, UA7, UA13 अशा या श्रेणी असतील.
  • महिलांविरुद्ध आपत्तीजनक सामग्री असल्याची तक्रार आल्यास अशा प्रकारची सामग्री 24 तासांच्या आत हटवणे बंधनकारक असणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूज मोठ्या प्रमाणावर पसरविण्यात येतात. सरकारला या गोष्टींची खूप माहिती मिळाली आहे. सोशल मीडियाचा उपयोग नकारात्मकता, तिरस्कार पसरविण्यासाठी केला जात आहे. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरावर तक्रारीसाठी फोरम मिळायला हवा. आम्ही सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराविरुद्ध आहोत, असेही रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.