Narendra Modi releasing the new series of Coins | (Photo Credits: PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांनी आज (गुरुवार, 7 मार्च) नवी नाणी जारी केली. आज मोदींनी जारी केलेल्या नवीन नाण्यात एक, दोन, पाच, दहा शिवाय वीस रुपयांच्या नाण्याचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे ही नवीन नाणी नेत्रहीन व्यक्ती देखील ओळखू शकतात. काही दिवसांपूर्वीच वीस रुपयाचे नाणे चलनात येणार असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली होती.

कसे असेल 20 रुपयांचे नाणे?

# 27 एमएम इतका 20 रुपयांच्या नाण्याचा आकार असेल. तर नाण्याचे वजन 8.54 ग्रॅम असेल.

#हे नाणे 65% तांबं, 15% झिंक आणि 20% निकेल पासून बनलेले असेल. याचा वापर बाहेरील रिंगसाठी करण्यात आला आहे. तर आतील भागासाठी 75% तांबं, 20% झिंक आणि 5% निकेल वापरण्यात आले आहे.

# नाण्याच्या वरील भागावर अशोक स्तंभावरील सिंह असेल ज्यावर सत्यमेव जयते असे लिहिले असेल.

# तर डाव्या बाजूला हिंदीत 'भारत' आणि उजव्या बाजूला इंग्रजीत 'INDIA'असे लिहिलेले असेल.

# नाण्याच्या मागील बाजूस '20' असे लिहिलेले असेल.

# तर रुपयाचे चिन्ह हे किंमतीच्या वर असेल.

# नाण्याच्या डाव्या बाजूला असलेले धान्यांच्या कणसाचे चिन्ह हे आपला देश कृषीप्रधान असल्याचे दर्शवते.

# नाण्याच्या मागच्या बाजूला वर आणि खाली उजव्या बाजूला '20 रुपये' असे हिंदीत आणि 'TWENTY RUPEES' असे इंग्रजीत लिहिलेले असेल.

नेत्रहीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही नवी नाणी जारी करण्यात आली. मार्च अखेरीसपर्यंत 26 हजार कोटी नाणी जारी करण्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.