भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Agency) अजीत डोभाल (Ajit Doval) यांनी काल (5 जुलै) व्हिडिओ कॉलवर चीनी विदेश मंत्री आणि राज्याचे काऊंसलर वांग यी (Wang Yi) यांच्यासोबत चर्चा केली आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, ही चर्चा सौदार्हपूर्ण आणि सकारात्मक झाली आहे. एनएसए अजीत डोभाल आणि चीनी विदेश मंत्री वांग यी यांनी सीमेवर शांतता ठेवण्याचं आणि भविष्यात अशा घटनांपासून दूर राहण्यावर चर्चा केली आहे.
दरम्यान जून महिन्यात दोन्ही देशांमध्ये सीमा वाद पाहता तणावाचं वातावरण होतं. जूनच्या मध्यात लद्दाख मध्ये गलवान खोर्यात भारतीय आणि चीनी सैन्यामध्ये हिंसक झडप झाली होती. यामध्ये सुमारे 20 भारतीय जवानांचा जीव गेला तर काही जखमी झाले होते. या घटनेनंतर देशात संतापाची लाट पसरली आहे. हे देखील वाचा: India-China Border Tensions: भारत-चीन तणावाप्रकरणी शरद पवार म्हणाले- 1962 मधील घटना लक्षात ठेवा; राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन राजकरण योग्य नाही.
ANI Tweet
The focus of the conversation between NSA Ajit Doval & Chinese FM Wang Yi was the full and enduring restoration of peace and tranquillity and to work together to avoid such incidents in future: Sources https://t.co/pPhvCqGEwh
— ANI (@ANI) July 6, 2020
काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निमू येथील लष्कराच्या कॅम्पला भेट देऊन त्याचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस जवानांना संबोधित करताना त्यांनी आता विस्तारवादाचं युग संपल, विकासवाद सुरू झाला आहे. असं म्हणत चीनला सज्जड इशारा दिला होता. हे देखील वाचा: PM Narendra Modi Leh Visit: विस्तारवादामुळे जगाचं मोठं नुकसान, आता विकासयुग सुरू झालंयं; PM नरेंद्र मोदी यांनी वाढवलं भारतीय जवानांचं मनोधैर्य
दरम्यान चीन कडूनदेखील परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक जारी करून भारत- चीन सैन्यामधील तणाव कमी करण्यासाठि प्रभावी मार्गांचा वापर केला जात असल्याचं सांगत नरमाईची भूमिका घेण्यात आली होती.