भारत-चीन देशामधील तणावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पवार यांनी असे म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन राजकरण करण्यात येऊ नये. खरंतर भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या हालचालींबाबत काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारवर टीका करत आहे. पवार यांनी केलेले विधान हे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपावनंतर समोर आले आहे. त्यामध्ये असे म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या क्षेत्राला चीनच्या आक्रमकतेपुढे सरेंडर केले आहे.(India-China Border Tension: 'चिनी घुसखोरी झाली नाही तर 20 जवान कसे व का मरण पावले'? सोनिया गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर साधला निशाणा)
राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष गलवान खोऱ्यात 15 जूनला झालेल्या घटनेनंतर सातत्याने केंद्रावर निशाणा साधत आहे. काँग्रेसने असे म्हटले आहे की, चीनच्या हालचालींबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन जनतेला खरी घटना सांगावी. तर पवार यांनी असे म्हटले आहे की, 1962 रोजी झालेल्या युद्धानंतर पहिल्यांदाच असे झाले जेव्हा बाजूचा देश भारताच्या भुमिच्या मोठ्या हिस्सावर आपला हक्क गाजवू पाहत आहे.(India-China Tensions: गलवान खोर्यातील संघर्षानंतर लद्दाख मध्ये आभाळात घिरट्या घालताना दिसलं वायुसेनेचं लढाऊ विमान Watch Video)
I don't think there is a possibility of war, but China has definitely committed a misadventure. The route which we are constructing in Galwan is on our side of the border: Sharad Pawar, NCP
— ANI (@ANI) June 27, 2020
सातारा येथे मीडियासोबत बोलताना शरद पवार यांनी असे म्हटले आहे की, आम्ही 1962 रोजी काय झाले ते विसरु शकत नाही. तेव्ही चीनने भारताच्या 45,000 स्क्वेअर फूट क्षेत्रावर कब्जा केला होता. मात्र आरोप लावण्याची सध्या वेळ नाही आहे. तसेच भुतकाळात काय झाले हे सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हा राष्ट्राच्या हिताचा मुद्दा असून याबाबत राजकरण करु नये.
दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसचा मित्रपक्ष असून शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा हिस्सा आहे. भारत-चीन सीमावाद 3,488 किमी एलएसी संदर्भात आहे. पवार यांनी असे ही म्हटले आहे की, गलवानच्या खोऱ्यातील हालचालींसाठी केंद्राला दोषी ठरवता येऊ शकत नाही. पुढे पवार यांनी असे ही सांगितले की, ज्यावेळी चीनकडून भारताच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आपल्या जवानांनी चीनच्या सैनिकांना पाठी ढकलण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आपले जवान अलर्ट नसते तर आपल्याला चीनच्या हालचालींबाबत कळलेच नसते. भारत-चीन च्या सैनिकांमध्ये झटापट झाली याचाच अर्थ आपण सतर्क होतो. त्यामुळेच मला असे वाटत नाही की अशा पद्धतीचे आरोप लावणे योग्य ठरेल असे ही शरद पवार यांनी म्हटले आहे.