जम्मू आणि कश्मीर (Jammu and Kashmir) राज्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांची अखेर नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. गेले 8 महिने ते श्रीनगर येथे नजरकैद (Detention) होते. मंगळवारी (24 मार्च 2020) त्यांची सुटका करण्यात आली. जम्मू कश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या राज्यघटनेच्या कलमातील अनुच्छेद 370 हटविण्यापूर्वी एक दिवस आगोदर म्हणजेच 4 ऑगस्ट 2019 च्या रात्री अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले होते. उब्दुल्ला यांच्यासोबत फारुक अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. उमर अब्दुल्ला यांची नजरकैद कालावधी 5 फेब्रुवारी या दिवशीच संपणार होता. मात्र, पब्लिक सेफ्टी एॅक्ट (पीसीए) अन्वये त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते.
उमर अब्दुल्ला यांची बहिन सारा पायलट यांनी पब्लिक सेफ्टी अॅक्ट 1978 (पीसीए) अन्वये भावाच्या अटकेला न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने 17 मार्च रोजी सुनावणी करताना प्रशासनाकडे उत्तर मागितले होते. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी जम्मू-कश्मीर प्रशासनाला विचारले होते की, जर उमर यांची सुटका करण्याचा विचार आहे तर, त्यांना लवकर सोडा. जर तुम्ही अब्दुला यांची सुटका लवकरात लवकर केली नाही तर त्यांच्या बहिणीने दाखल केलेल्या याचिकेवर मेरीटच्या आधारे सुनावणी घेण्यात येईल. न्यायालयाने जम्मू-कश्मीर प्रशासनाच्या वकीलांना असेही म्हटले होते की, केंद्र सरकारकडून निर्देश मिळवा आणि न्यायालयाला माहिती द्या.
नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्ष फारुक अब्दुल्ला हे 13 मार्च रोजी नजरैदेतून मुक्त झाले होते. ऑगस्टमध्ये नजरकैद केल्यानंर गेल्या वर्षी 15 सप्टेंबर या दिवशी त्यांना पुन्हा पब्लिक सेफ्टी अॅक्ट अन्वये ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या नजरकैदेचा कालावधी तीन-तीन महिन्यांच्या कालावधीने वाढविण्यात आला होता. तसा आदेश तीन वेळा काढण्यात आला होता. गेल्या वर्षी 11 मार्च रोजी शेवटचा आदेश जारी झाला. जो सरकारने मागे घेतला होता.
फारुक यांची सुटका झाल्यावर एक दिवसांनी ते आपला मुलगा आणि जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना भेटले. गेल्या सातमहिन्यांमधील ही पीता-पूत्रांची पहिलीच भेट होती. सुटका झाल्यानंतर फारुक अब्दुल्ला यांनी मुलगा उमर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जम्मू कश्मीर प्रशासनाने त्यांना श्रीनगर येथील एका उप-कारागृहात भेटण्याची परवानगी दिली होती. दोघांमध्ये सुमारे एक तासभर चर्चा झाली. या वेळी फारुक यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांची आणि अन्य नातेवाईकांचीही भेट झाली. दरम्यान, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासह इतरही अनेक नेते आजही नजरकैद आहेत. (हेही वाचा, Coronavirus: लडाख मधील भारतीय सैन्य दलाच्या जवानाला वडिलांसहित कोरोना ची लागण)
एएनआय ट्विट
#WATCH National Conference leader Omar Abdullah released from detention in Srinagar pic.twitter.com/uV4BWNVyLb
— ANI (@ANI) March 24, 2020
दरम्यान, 9 मार्च या दिवशी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे मागणी केली होती की, नजरकैद असलेल्या जम्मू-कश्मीरमधील नेत्यांची सूटका करवी. ही मागणी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, तृणमूल अध्यक्षा ममता बॅनर्जी, जेडीएस नेता एचडी देवेगौडा, सीपीएम नेता सीताराम येचुरी, सीपीआई चे डी राजा, राजद नेता मनोज झा, माजी भाजपा नेता यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांच्या नावाचा समावेश होता.