PM Narendra Modi with BJP President Amit Shah (Photo Credits: IANS)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) चे निकाल हाती आल्यानंतर आता एनडीएने 350 चा टप्पा पार केला आहे. तर भाजपाने स्वबळावर 300 जागांचा टप्पा पार केला आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांनी निकालानंतर मतदार आणि भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. आता 30 मे रोजी नव्या सरकारची स्थापना केली जाईल तसेच शपथविधी सोहळा पार पडेल असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. संध्याकाळी 4-5 वाजता हा सोहळा दिल्लीमध्ये पार पडणार आहे. Maharashtra Lok Sabha Elections Results 2019: लोकसभा निवडणूक निकाल 2019 चे महाराष्ट्रातील 48 विजयी खासदार; पहा संपूर्ण यादी

आज (24 मे) च्या रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खास मेजवानीचं आयोजन केलं आहे. यामध्ये कॅबिनेटमधील मंत्र्यांना आज संध्याकाळी मोदी सरकारच्या कॅबिनेटची शेवटची मिटींग होणार आहे.

सध्या एनडीएच्या नेत्यांची अमित शहा यांच्या घरी बैठक सुरू आहे. यामध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचा समावेश आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आशिर्वाद घेणार आहेत.