Maharashtra Lok Sabha Elections Results 2019 Final Winners List: अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक निकाल 2019 चे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. देशासह महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा या निवडणूकीमध्ये पहायला मिळाला आहे. केंद्रात भाजपाला यंदा बहुमत मिळालं आहे. त्यामुळे एनडीए सरकार सत्तास्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहेत.नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शहा (Amit Shah) यांच्यासह यंदा देशात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षातील विजयी उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघांमध्ये भाजप शिवसेना युतीचं वर्चस्व आहे. पहा महाराष्ट्रातील 48 विजयी उमेदवार म्हणजेच खासदारांची संपूर्ण यादी. Lok Sabha Election Results 2019: भाजपा मुंबई कार्यालयाबाहेर ढोल ताशांच्या गजरात सेलिब्रेशनला सुरूवात (Photos)
महाराष्ट्रातील 48 विजयी खासदार
- अहमदनगर - डॉ.सुजय विखे पाटील (भाजपा)
- अकोला - संजय धोतरे (भाजपा)
- अमरावती - नवनीत राणा (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
- औरंगाबाद - इम्तियाज जलिल (एमआयएम)
- बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
- बीड - प्रीतम मुंडे (भाजपा)
- भंडारा गोंदिया - सुनील मेंढे (भाजपा)
- भिवंडी - कपिल पाटील (भाजपा)
- बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना)
- चंद्रपूर - सुरेश धानोरकर (कॉंग्रेस)
- धुळे - सुभाष भामरे (भाजपा)
- दिंडोरी - भारती पवार (भाजपा)
- गडचिरोली - अशोक नेते (भाजपा)
- हातकंणगले - धैर्यशील माने (शिवसेना)
- हिंगोली - हेमंत पाटील (शिवसेना)
- जळगाव - उमेश पाटील (भाजपा)
- जालना - रावसाहेब दानवे (भाजपा)
- कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना)
- कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना)
- लातूर - सुधाकर शृंगारे (भाजपा)
- माढा - रणजीतसिंह निंबाळकर (भाजपा)
- मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना)
- मुंबई साऊथ - अरविंद सावंत (शिवसेना)
- मुंबई नॉर्थ - गोपाल शेट्टी (भाजपा)
- मुंबई नॉर्थ सेंट्रल - पूनम महाजन (भाजपा)
- मुंबई नॉर्थ ईस्ट - मनोज कोटक (भाजपा)
- मुंबई नॉर्थ वेस्ट - गजानन कीर्तिकर (शिवसेना)
- मुंबई साऊथ सेन्ट्रल - राहुल शेवाळे (शिवसेना)
- नागपूर - नितीन गडकरी (भाजपा)
- नांदेड - प्रतापराव चिखलीकर (भाजपा)
- नंदुरबार - हीना गावीत (भाजपा)
- नाशिक - हेमंत गोडसे (भाजपा)
- उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
- पालघर - राजेंद्र गावित (शिवसेना)
- परभणी - संजय जाधव (भाजपा)
- पुणे - गिरीष बापट (भाजपा)
- रायगड - सुनील तटकरे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस)
- रामटेक - कृपाल तुमाणे (शिवसेना)
- रत्नागिरी - विनायक राऊत (शिवसेना)
- रावेर - रक्षा खडसे (भाजपा)
- सांगली - संजय पाटील (भाजपा)
- सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
- शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना)
- शिरूर - अमोल कोल्हे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
- सोलापूर - जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजीं (भाजपा)
- ठाणे - राजन विचारे (शिवसेना)
- वर्धा - रामदास तडस (भाजपा)
- यवतमाळ - भावना गवळी (शिवसेना)
महाराष्ट्रात 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल या चार दिवसात चार टप्प्यातील मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 19 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघात तर चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रात चार टप्प्यात मिळून एकूण 60.67% मतदान झाले आहे.