एक्झिट पोल पाठोपाठ लोकसभा निवडणूक निकालाचे कल स्पष्ट झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये शिवसेना भाजपा युतीचे सहाही उमेदवार आघाडीवर त्यामुळे मुंबईमध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईमध्ये भाजपा कार्यालयाबाहेर ढोल ताशांचा गजर सुरू झाला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप करायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रासह देशात भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल असं चित्र आहे. Maharashtra Lok Sabha Election Results 2019: मुंबई मध्ये शिवसेना - भाजपा युतीचं 6 लोकसभा मतदार संघांमध्ये वर्चस्व; कॉंग्रेसचा सुपडा साफ
ANI Tweet
Maharashtra: Celebrations outside BJP office in Mumbai. #ElectionResults2019 pic.twitter.com/r8LQIEorjD
— ANI (@ANI) May 23, 2019
मुंबईतील मुख्य कार्यालयाबाहेर मराठ मोळ्या पारंपारिक वेषात ढोल ताशे वाजवत सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. यामुळे काही काळ ऑफिस परिसरातील वाहतूकही मंदावली आहे.
महाराष्ट्रात 48 मतदारसंघांमध्ये काय आहेत निकाल?
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये देशात 542 जागांवर मतदान झाले आहे. तर महाराषष्ट्रात 48 जागांवर मतदान झाले आहे. सध्या कल हातामध्ये आले आहेत. पुढील काही तासातच निकाल स्पष्ट होणार आहेत.