Maharashtra Lok Sabha Election Results 2019: मुंबई मध्ये शिवसेना - भाजपा युतीचं 6 लोकसभा मतदार संघांमध्ये वर्चस्व; कॉंग्रेसचा सुपडा साफ
Lok Sabha Elections Results (File Photo)

लोकसभा निवडणूक निकाल 2019 चे निकाल हाती येण्यास आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सध्या ट्रेंड्सनुसार देशात एनडीएकडे बहुमताकडे कूच करत आहे. भाजपा स्वबळावर सत्तेत येण्याचं चित्र समोर आलं आहे. मुंबईतही सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा- शिवसेना पक्षाची युती ट्रेंड्समध्ये आघाडीवर असल्याचं चित्र समोर आले आहे. पुढील काही तासातच लोकसभा निवडणूक निकालाचे चित्र समोर येणार आहे.  एका क्लिकवर पहा काय आहेत महाराष्ट्रसह भारत देशात काय आहेत निकाल?

मुंबईमध्ये कोण आहे आघाडीवर ?

निवडणूक निकाल कलांनुसार, मुंबई उत्तर मध्ये गोपाळ शेट्टी, मंबई वायव्य मध्ये गजानन किर्तीकर, मुंबई इशान्य मध्ये मनोज कोटक, मुंबई उत्तर मध्य मध्ये पुनम महाजन, मुंबई दक्षिण-मध्य मध्ये राहुल शेवाळे, मुंबई दक्षिण मध्ये अरविंद सावंत आघाडीवर आहेत. Lok Sabha Election Results 2019: लोकसभेच्या निकालाची पहिली फेरी काँग्रेससाठी ठरलीय धोक्याची घंटा, काँग्रेसचे दिग्गज नेते पिछाडीवर तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचाही पिछाडीच्या यादीत समावेश

सुरूवातीला पोस्टल मतदान, त्यानंतर सामान्यांचं मतदान यांची मोजणी होणार आहे. ही मतमोजणी झाल्यानंतर लॉटरी माध्यमातून व्हीव्हीपॅट मशिनची मतमोजणी होईल. विधानसभा मतदारसंघानुसार पाच व्हीव्हीपॅट मशीनची क्रमाक्रमाने मोजणी.