Lok Sabha Election Results 2019: लोकसभेच्या निकालाची पहिली फेरी काँग्रेससाठी ठरलीय धोक्याची घंटा, काँग्रेसचे दिग्गज नेते पिछाडीवर तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचाही पिछाडीच्या यादीत समावेश
Ashok Chavan,Rahul Gandhi (Photo Credits: PTI)

Lok Sabha Election Results 2019: अत्यंत अटीतटींचा मानला जाणारा लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालाला सुरुवात झाली असून, मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच काँग्रेसला जबरदस्त झटका बसलाय. महाराष्ट्रासह दिग्गज नेत्यांसह देशातील काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) पिछाडीवर आहे. ही काँग्रेससाठी नक्कीच चांगली गोष्ट नाही असे म्हणता येईल. महाराष्ट्रातील पिछाडीवर असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या यादीत उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा(Milind Deora), नांदेड मधून अशोक चव्हाण(Ashok Chavan) आणि सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar shinde)यांचा समावेश आहे.

Lok Sabha Elections Results 2019 Saam TV LIVE NEWS STREAMING: लोकसभा निवडणूक निकाल 2019, इथे पहा लाईव्ह

ह्या पिछाडीवर असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या यादीत काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीमधून हे भाजपाच्या उमेदवार स्मृति ईरानींपेक्षा(Smriti Irani) 6000 मतांनी मागे आहेत. ही काँग्रेसची खूपच धक्कादायक अशी बातमी आहे असच दिसतय. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांपेक्षा (Pratap Patil Chikhalikar) 1000 मतांनी मागे आहेत. त्यामुळे काँग्रेसचे प्रमुख नेतेच जर पिछाडीवर असेल तर काँग्रेस सत्तेवर येण्याबाबतीतच लोकांमध्ये साशंकता निर्माण झालीय. तर दुसरीकडे उत्तर मुंबईमधून उर्मिला मातोंडकर(Urmila Matondkar), सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)आणि दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा (Milind Deora) हे काँग्रेसचे दिग्गज नेते पिछाडीवर आहेत.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

असे असले तरी हा पहिल्या फेरीतील निकाल आहे, अजून अनेक फे-या होणे बाकी आहे. परंतू तरीही पिछाडी उमेदवारांच्या यादीत काँग्रेसच्या अशा दिग्गज नेत्यांची नावे असतील तर काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे असेच म्हणावे लागेल.