Lok Sabha Elections Results 2019 Saam TV LIVE NEWS STREAMING: लोकसभा निवडणूक निकाल 2019, इथे पहा लाईव्ह
Lok Sabha Election Results 2019 (Photo Credits: File Photo)

लोकसभा निवडणूक निकाल 2019 (Lok Sabha Elections Result): गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेली लोकसभा निकालाची धामधुम आणि नुकताच हाती आलेला एक्झिट पोल या सर्वांचे उत्तर आता काही वेळात मिळायला सुरुवात होणार आहे.  यंदाची निवडणूक देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज (23 मे) दिवशी हाती येण्यास सुरुवात होईल. सकाळी आठ वाजल्यापासून कोणत्या राज्यात कोणाचा पल्ला भारी होईल, कोणाचा दबदबा कायम राहिल आणि कोणाला पराभवाला सामोरे जावे लागेल हे समजेल. नुकत्याच जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या(Exit Poll) अंदाजानुसार केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असं अंदाज वर्तविण्यात आला आहे, मात्र मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिलाय यांचे लाइव्ह लेखाजोखा आपल्याला आजच पाहायला मिळेल. देशात पुन्हा मोदी सरकार येणार की अन्य कोणाचे  हे पाहण्यासाठी पहा साम टीव्ही (Saam TV) लाईव्ह इलेक्शन कव्हरेज, अधिक माहितीसाठी Saam TV च्या Official Page ला भेट द्या

Lok Sabha Elections Results 2019 TV9 LIVE NEWS STREAMING: लोकसभा निवडणूक निकाल 2019, इथे पहा लाईव्ह

देशामध्ये यंदा 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, 3ऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, 4थ्या टप्प्यात 9 राज्यातील 71 मतदारसंघ, 5व्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, 6व्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि 7 व्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात अनुक्रमे 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी मतदान पार पडले.

लोकसभा निवडणुक 2019 चे Live निकाल कंप्युटर आणि मोबाईलवर 'या' पद्धतीने पाहा

या मतदानाची मतमोजणी आज देशात पार पडते आहे. एकूण 542 जागांसाठी पार पडलेल्या मतदानामध्ये यंदा कुणाच्या गळ्यात खासदारपदाची माळ पडते हे पाहण्यासाठी अजून काही तास वाट पहावी लागणार आहे.