Narendra Modi and Rahul Gandhi (Photo Credits- File Photo)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) निकालाची वाट संपूर्ण देशातील जनता पाहत आहे. तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात पुढील पाच वर्षासाठी कोणाचा पक्ष यंदाच्या निवडणुकीत बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एक्झिट पोल पाहता देशात पुन्हा एकदा मोदी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजप पक्षाला बहुमत मिळेल असासुद्धा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाला बहुमत मिळेल की नाही याची शंका बाळगत आहेत. परंतु सत्ता कोणाची येणार हे 23 मे रोजीच स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल तुम्ही लेटेस्टली मराठी marathi.latestly.com वर लाइव पाहू शकणार आहात. लेटेस्टली निकालाचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहचवणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालाचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या संकेतस्थळा जरुर भेट द्या.

लेटेस्टली मराठी यांच्या अधिकृत वेबसाईट्सह आमच्या ट्वीटर अकाउंट @LatestLYMarathi, फेसबुक पेज www.facebook.com/LatestLYMarathi/ येथे निकालासंबंधित सर्व अपडेट तुम्हाला मिळणार आहेत. लेटेस्टली मराठी Helo अॅपवर सुद्धा उपलब्ध आहे. तसेच निवडणुकीचे निकाल तुम्ही निवडणुक आयोगाची अधिकृत वेबसाईट www.eci.gov.in येथे सुद्धा पाहू शकणार आहात. (Lok Sabha Election Result 2019: निवडणूकीचे संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी पाहावी लागणार शुक्रवार पहाटेपर्यतची वाट?)

देशभरातील 542 जागांसाठी मतदान पार पडले. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अन्य पक्षाच्या उमेदवारांनी यंदा जोरदार प्रचारसभेतून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्या येणाऱ्या निकालावरुन देशभरासह महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय मंडळींच्या भविष्याचा फैसला मतदार करणार आहेत.