Lok Sabha Elections Results 2019 TV9  LIVE NEWS STREAMING: लोकसभा निवडणूक निकाल 2019, इथे पहा लाईव्ह
पीएम मोदी आणि राहुल गांधी (File Photo)

लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Elections 2019) मधील बहुप्रतीक्षित निकाल आज लागणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होणार आहे. यंदा लोकसभेची निवडणूक देशभरात सात व महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. यानुसार महाराष्ट्रात क्रमशः 11 , 18 , 23 आणि 29 एप्रिल रोजी 48 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले होते. यामध्ये झालेल्या मतांची मोजणी सुरु होऊन आता काहीच वेळात मताधिक्यांचे निकाल हाती येण्यास सुरवात होईल. दरम्यान, निवडणूक मतदानांनंतर समोर आलेल्या एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेससाठी प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत.

यंदाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध आघाडीची जोरदार लढत पाहायला मिळाली होते त्यामुळे महाराष्ट्राचा कौल कोणाला मिळतो हे पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. TV9  ने सादर केलेल्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेना 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच याप्रमाणे निकाल लागल्यास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. . TV9 एक्झिट पोल खरा ठरणार का आणि यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात काय बदल घडणार हे जाणून घेण्यासाठी पहा TV9 चं लाईव्ह इलेक्शन कव्हरेज

TV9 लाईव्ह इलेक्शन कव्हरेज

Lok Sabha Elections Results 2019 ABP Majha LIVE NEWS STREAMING: लोकसभा निवडणूक निकाल 2019, इथे पहा लाईव्ह

देशामध्ये यंदा 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. या मतदानाची मतमोजणी आज देशात पार पडते आहे. एकूण 543 पैकी 542 जागांसाठी पार पडलेल्या मतदानामध्ये देशात आणि महाराष्ट्रात कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होणार याच्या अंतिम निकालासाठी अजून काही तास वाट पहावी लागणार आहे.