Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
33 minutes ago

लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live News Updates: नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात, विजयानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद

राजकीय Chanda Mandavkar | May 23, 2019 08:03 PM IST
A+
A-
23 May, 20:03 (IST)

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला  सुरुवात, जनतेचे आभार मानत आनंद व्यक्त केला.

- यंदाचा लोकसभा निवडणुकीचा निकाल  ऐतिहासिक - नरेंद्र मोदी

23 May, 19:35 (IST)

-बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या मते यंदा लोकसभा  निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागला आहे.

23 May, 19:20 (IST)

- आंध्र प्रदेशचे एन. चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा गव्हर्नर यांच्याकडे सोपवला

23 May, 19:06 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील  भाजप मुख्यालयाकडे रवाना

23 May, 19:00 (IST)

सनी देओल पंजाब मधील गुरुदासपूर मधून विजयी. भाजपाकडून सनी देओलला तिकीट देण्यात आलं होतं. 

23 May, 18:51 (IST)

-एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन औवेसी यांचा निकालावरुन आक्षेप

- व्हीव्हीपॅटची रॅगिंग 100 टक्के नाही मात्र हिंदूची मनांची रॅगिंग केली आहे.

-बेगुसराय येथे कन्हैया कुमार यांचा पराभव

23 May, 18:42 (IST)

-गोरखपूर मधून भाजपचे रवी किशन विजयी

सुलतानपूर मतदारसंघातून भाजपच्या मनेका गांधी विजयी

 

23 May, 18:16 (IST)

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन नावामागील हटवला चौकीदार शब्द, सर्व भाजप कार्यकर्त्यांना चौकीदार शब्द हटवण्याचे आवाहन

23 May, 18:02 (IST)

-महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा

23 May, 17:46 (IST)

-राहुल गांधी यांच्यासह  प्रियांका गांधी/वड्रा यांची  पत्रकार परिषदेसाठी उपस्थिती

- राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा

-जनतेने पुन्हा एकदा मोदी यांना निवडणुक दिल्याच्या निर्णयाचा मी आदर करतो- राहुल गांधी

-अमेठी येथून स्मृती ईराणी यांचा विजय

-प्रियांका गांधी यांनी पत्रकार परिषदेनंतर नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Load More

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) पार पडल्यानंतर आज (23 मे) देशातील सर्व जनतेला कोणाची सत्ता येणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच सकाळी 8 वाजल्यापासून मतदान मोजणी सुरु झाली आहे. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार यंदासुद्धा मोदी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आज जाहीर होणाऱ्या अंतिम निकालानंतर नेमकी कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. तसेच यंदा भारताचे नवे पंतप्रधान कोण होणार याची सुद्धा उत्सुकता अवघ्या देशाला लागून राहिली आहे. तर या मतदान मोजणीचे सर्व अपडेट तुम्हाला येथे एका क्लिकवर मिळणार आहेत.

देशात पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, चौथ्या टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघ, पाचव्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि सातव्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात मतदान झाले.

मात्र मतदान मोजणी करताना देशात हिंसाचाराचा कोणताही प्रकार घडू नये म्हणून केंद्र सरकारकडून सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालासंबंधित कालावाधीनुसार संपूर्ण मतदान प्रक्रिया 15 ते 18 तासात पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.(लोकसभा निवडणुक 2019 चे Live निकाल कंप्युटर आणि मोबाईलवर 'या' पद्धतीने पाहा)

एकूणच देशभरातील 542 जागांसाठी मतदान पार पडले असून 60 करोड मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अन्य पक्षाच्या उमेदवारांनी यंदा जोरदार प्रचारसभेतून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आज येणाऱ्या निकालावरुन देशभरासह महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय मंडळींच्या भविष्याचा फैसला मतदार करणार आहेत.


Show Full Article Share Now