निलेश राणे आणि नितेश राणे (Nitesh Rane) हे दोघेही बंधून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत येतात. पण आता त्यांचे वडील आणि भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane Controversial Statement) यांनी देखील असेच काहीसे वक्तव्य केले आहे. 'नितेश राणे आणि हिंदू विरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील', असे धक्कादायक विधान राणे यांनी केले आहे. सांगितले जात आहे की, नितेश यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना निवडणूक प्रचारादरम्यान एमआयएम (MIM) उमेदवार नासिर सिद्दिकी (Naser Siddiqui) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित जाहीर सभेत केलेल्या विधानानंतर नारायण राणे यांची प्रतिक्रिया आली आहे.
नासिर सिद्दिकी यांनी यांनी काय म्हटले?
छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएम (MIM) नेते अकबरुद्दी ओवैसी यांनी नासिर सिद्दिकी यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या सभेदरम्यान बोलताना सिद्दीकी यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. ते म्हणाले, ''एक पाच फूट, 5 रुपयावाला पेप्सी मशिदीत घुसून मारू, अशी भाषा करतो, एवढी हिंमत वाढलीय''. पण, मी तुम्हाला सांगतो की, मी त्याला विधानसभेत घुसून मारण्याची ताकत ठेवतो. महत्त्वाचे म्हणजे सिद्दीकी यांनी नितेश राणे यांचे नाव घेतले नाही. मात्र, त्यावर नारायण राणे यांची तीव्र प्रतिक्रिया आली आहे. (हेही वाचा, Nitesh Rane Provocative Statement: हिंदूंकडे तिरक्या नजरेने पाहणाऱ्याला मारून टाकेल; नितीश राणेंचे प्रक्षोभक वक्तव्य, गुन्हा दाखल)
नारायण राणे यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटले?
एमआयएमचे छत्रपती संभाजीनगर मध्यचे उमेदवार नासिरसिद्दीकी यांनी आमदार नितेश राणे यांना विधानसभेत घुसुन मारण्याची धमकी जाहीर भाषणातूनदिली. हा तोच पक्ष आहे, ज्याच्या प्रमुखांनी एक एक मुसलमान वीस हिंदुंना भारी पडेल अशी दर्पोक्ती केली होती. निजामशाहीच्या या पाठिराख्यांनी लक्षात ठेवावे, देशात आता लांगुलचालन करणाऱ्यांचे सरकार नसून बहुसंख्यांचे हितरक्षण करणारे सरकार आहे. नितेश राणे व हिंदू विरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआदीच कलम केले जातील, असेनारायण राणे यांनी आपल्या एक्स (जुने ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे (हेही वाचा -BJP MLA Nitesh Rane यांच्याविरूद्ध प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपाखाली 2 FIRs दाखल)
राणे यांचे वादग्रस्त विधान
निजामशाहीच्या पाठीराख्यांना इशारा pic.twitter.com/1fWNOluzIz
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 6, 2024
दरम्यान, नितेश राणे यांनीही मागे एका सभेत बोलताना अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. जे त्यांच्या पक्षाने म्हणजे भाजपनेही स्वीकारले नव्हते. इतकेच नव्हे तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश यांना वादग्रस्त विधान करण्यापासून स्वत:ला रोखले पाहिजे असा सल्ला दिला होता. नितेश यांनी मशिदींमध्ये घुसुन मारण्याची भाषा केली होती. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या विधानावरुन मुंबईतील भाजप नेत्यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त करत नितेश राणे यांना आव्हान दिले होते.