Nitesh Rane | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र मध्ये भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर प्रक्षोभक भाषण दिल्याच्या कारणावरून राजकारण तापलेलं आहे. राणेंविरूद्ध या प्रकरणावरून दोन FIR दाखल करण्यात आले आहेत. अहमदनगर मध्ये सकल हिंदू समाज आंदोलनामध्ये मुस्लिम बांधवांना खुली धमकी देण्यात आली होती.

महाराष्ट्र मध्ये अहमदनगरात नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राणे यांच्यावर प्रक्षोभक भाषण देण्यासोबतच धार्मिक भावनांना ठेच पोहचवल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरूद्ध दाखल गुन्ह्यामध्ये कलम 302, 153 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नितेश राणेंनी एका कार्यक्रमामध्ये मुसलमानांना उघड धमकी दिली आहे आणि यावेळी त्यांना 'चुन-चुन कर मारेंगे' अशी धमकी दिली. यावरूनच त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यामध्ये श्रीरामपूर आणि तोफखाना मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान अहमदनगर मध्ये रामगिरी महाराज च्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू समाजातील लोकं उपस्थित होती. या मोर्च्यानंतर नितेश राणेंची एक सभा झाली यामध्ये बोलताना त्यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून धमकी दिली आहे. यामध्ये त्यांनी ' जर आमच्या रामगिरी महाराजांच्या विरूद्ध काही कुणी बोललं तर मशिदी मध्ये येऊन एकेकाला मारेन'.

महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या पैगंबरांवर टिप्प्णी केल्यानंतर त्यांच्या विरूद्ध अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. यामध्ये अहमदनगर मध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ नितेश राणे उतरले आणि त्यांनी मोर्च्याचे नेतृत्त्व केले.

AIMIM नेता वारिस पठाण यांनी नितेश राणे यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. भाजपा निवडणूकीपूर्वी हिंसा करण्याचा उद्देश आहे. नीतेश राणे यांचे भाषण प्रक्षोभक आहे. नितेश राणे यांच्यावर एफआयआर आणि कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे.