File image of air pollution (Photo Credits: PTI)

2020 मध्ये नवी दिल्ली (Delhi) सलग तिसर्‍या वर्षी जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी (Most Polluted Capital) ठरली आहे. फुफ्फुसांचे नुकसान करणारे वायुजनित कण पीएम 2.5 वर आधारित हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणारे, स्विश ग्रुप आयक्यू एअरच्या (IQ Air) अभ्यासामध्ये ही बाब समोर आली आहे. आयक्यू एअरच्या 2020 च्या जागतिक वायु गुणवत्तेच्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक दूषित 30 शहरांपैकी (Most Polluted Cities) 22 ही भारतात आहेत. या अहवालात 106 देशांमधील डेटा संकलित केला आहे. हा अहवाल देशाच्या वार्षिक सरासरी पार्टिकल्युलेट पीएम 2.5 वर आधारित आहे.

पीएम 2.5 हे 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी व्यासाचे हवायुक्त कण आहेत. या कणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने कर्करोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होतात. 2020 मध्ये नवी दिल्लीतील एक कुबिक मीटरमध्ये पीएम 2.5 कणांचे वार्षिक साठा 84.1 आहे. हे बीजिंगपेक्षा दुप्पट आहे. बीजिंगमध्ये हा आकडा 37.5 आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये बीजिंग 14 व्या क्रमांकावर आहे. ग्रीनपीस दक्षिणपूर्व एशिया विश्लेषण आणि आयक्यूएयर यांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, 2020 मध्ये हवेच्या प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये वेळेपूर्वी 54,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

लॉकडाऊनमुळे पीएम 2.5 पातळी वार्षिक सरासरी 11% ने कमी झाली आहे. असे असूनही, बांगलादेश आणि पाकिस्ताननंतर भारत तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. सध्या देशातील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर आहे. 2019 च्या तुलनेत दिल्लीची हवेची गुणवत्ता 2020 मध्ये सुधारली आहे. परंतु या सुधारणेनंतरही जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा दहावा क्रमांक लागतो. परंतु राजधानीच्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर आहे. (हेही वाचा: राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणं महागणार; 1 एप्रिलपासून टोल दरात 5 टक्क्यांची वाढ)

दिल्लीसह गाजियाबाद, बुलंदशहर, बिसरख जलालपुर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपुर, लखनऊ, मेरठ, आगरा, मुजफ्फरनगर, भिवाड़ी, फरीदाबाद, जींद, हिसार, फतेहाबाद, बंधवाड़ी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक, धारुहेड़ा, मुजफ्फरपुर ही देशातील प्रदूषित शहरे आहेत. रिपोर्टनुसार चीनचे शिंजियांग हे सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.