राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणं महागणार; 1 एप्रिलपासून टोल दरात 5 टक्क्यांची वाढ
Toll Plaza (Image: PTI)

भारतातील राष्ट्रीय महामार्गावर (National Highways) 1 एप्रिल 2021 पासून प्रवास करताना तुमच्या खिशावर अधिक ताण पडणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) टोल दरात 5 टक्क्यांनी वाढ करणार आहे. याशिवाय मासिक पासवरही भाडे वाढविण्याची चिन्हे आहेत. एनएचएआय प्रत्येक आर्थिक वर्षात टोल टॅक्स वाढवत असते. पुढील महिन्यापासून ही वाढ करण्यात येईल. या निर्णयामुळे वाहतूकदार तसेच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

FASTag मुळे टोलनाक्यावर लागणाऱ्या लांबलचक रांगा कमी झाल्या. ज्यामुळे केवळ इंधनचं नव्हे तर लोकांचा वेळही वाचवला. अलीकडेचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असा अंदाज लावला होता की, जर सर्व वाहनांनी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासादरम्यान फास्टॅग वापरण्यास सुरवात केली तर भारत दरवर्षी पेट्रोल आणि डिझेलवर सुमारे 20,000 कोटी रुपयांची बचत करेल. (वाचा - Driving License संदर्भातील 'या' नियमात मोठा बदल; आता रविवारीही करू शकता 'हे' काम, वाचा सविस्तर)

इलेक्ट्रॉनिक टोल संकलनासाठी FASTags अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे टोल प्लाझावरील विलंबामध्ये लक्षणीय घट झाली आहे. 16 फेब्रुवारीपासून सर्व महामार्गावरील टोल प्लाझावर सर्व वाहनांसाठी FASTags अनिवार्य करण्यात आला होता. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे टोल संकलनात अनेक पटींनी वाढ झाली आहे.

दरम्यान, NHAI म्हणण्यानुसार, FASTags मुळे दररोज टोल संग्रह 104 कोटींवर पोहोचण्यास मदत केली आहे. 2008 मध्ये प्रत्येक टोल प्लाझावर कर वाढविण्याची तरतूद होती. त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षात टोल टॅक्स वाढविला जातो. अशातचं आता लोक फास्टॅगबद्दलही सक्रिय झाले आहेत.