
मीरा भाईंदर मध्ये अमराठी व्यापार्यांच्या मोर्च्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मनसे कडून मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मोर्च्याचे आयोजन केले होते. या आंदोलनामध्ये मराठी माणसाने एकजूट दाखवावी असं आवाहन करण्यात आले होते. मात्र पहाटेपासूनच पोलिसांनी कलम 144 लागू करतpratap sarnaik जमावबंदी केली. मनसेच्या काही नेत्यांची धरपकड केली आणि आंदोलन चिघळण्यास सुरूवात झाली. सध्या मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला आणि मोर्च्यात ते सहभागी झाले. मात्र मोर्च्यात त्यांना आंदोलकांकडून योग्य साथ मिळाली नाही.
मंत्री प्रताप सरनाईकांना हुसकवण्यात आले
यावेळी प्रताप सरनाईकांवर बॉटल देखील फेकण्याचा प्रयत्न झाला. मीरा भाईंदर मधील मोर्च्यात आज मनसे सोबत ठाकरे सेनेचे देखील कार्यकर्ते होते. यावेळी काही आंदोलकांकडून मंत्री सरनाईकांना हुसकवण्यात आले.
प्रताप सरनाईक मोर्च्यात येताच गोंधळ
View this post on InstagramA post shared by Sakal News (@sakalmedia)
मीरा भाईंदर मधील मोर्च्याचे आयोजक अविनाश जाधव यांनी मात्र मंत्री सरनाईकांना मिळालेल्या वागणूकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अविनाश यांना पहाटेच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची 10-12 तासांनंतर सुटका झाल्यावर त्यांनी आपण मोबाईल वर लाईव्ह आंदोलन पाहिले आहे. सरनाईक एक मराठी माणूस म्हणून आंदोलनात आले होते. त्यांना अशी वागणूक मिळायला नको होती असं म्हटलं आहे. आता मत भेद विसरून मराठी म्हणून एकत्र राहणं गरजेचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.