Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी मीरा-भाईंदरसाठी (Mira-Bhayandar) MH-58 या शहर कोडसह, नवीन उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय (सब-आरटीओ) मंजूर केले. हे नवीन कार्यालय ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे असेल आणि ते परिसरातील रहिवाशांच्या गरजा पूर्ण करेल आणि आवश्यक वाहतूक सेवा प्रदान करेल. यामुळे, महाराष्ट्रातील एकूण उप-आरटीओ कार्यालयांची संख्या 33 वरून 34 झाली आहे, तर सध्याच्या 24 पूर्ण आरटीओ कार्यालयांची संख्याही वाढली आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) परिवहन कार्यालयांची संख्या आता 11 झाली आहे, ज्यामध्ये सहा आरटीओ आणि पाच उप-आरटीओचा समावेश आहे.

1 मार्च हा दिवस आरटीओ स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने, राज्य परिवहन मंत्रालयाने मीरा-भाईंदरच्या लोकांसाठी आनंदाची बातमी दिली. राज्यातील 58 वे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे उघडले जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स जारी करणे, वाहन फिटनेस तपासणी करणे, विमा आणि प्रदूषण चाचण्या पडताळणे, रस्ता कर वसूल करणे आणि वैयक्तिक नोंदणी क्रमांक वाटप करण्यात सब-आरटीओ महत्त्वाची भूमिका बजावते. सरनाईक यांनी भर दिला की हा उपक्रम वेगाने वाढणाऱ्या शहरी भागात वाहतूक सुविधा सुधारण्याच्या सरकारच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे. (हेही वाचा: Tesla First Indian Showroom: टेस्लाचे पहिले भारतीय शोरूम मुंबईमधील BKC इथे उघडणार; मासिक भाडे 35 लाख रुपये- Reports)

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 2009 पासून मीरा-भाईंदरमधील रहिवाशांचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे, मीरा-भाईंदरमध्ये परिवहन विभागाचे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय उघडले जात आहे. मीरा-भाईंदरची वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाहन मालकांची वाढती संख्या लक्षात घेऊन, सरकारने येथे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील आरटीओ मालिकेची संपूर्ण यादी-

MH01: मुंबई (दक्षिण) - ताडदेव

MH02: मुंबई (पश्चिम) - अंधेरी

MH03: मुंबई (पूर्व) – घाटकोपर

MH04: ठाणे

MH05: कल्याण

MH06: रायगड

MH07: सिंधुदुर्ग

MH08: रत्नागिरी

MH09: कोल्हापूर

MH10: सांगली

MH11: सातारा

MH11: पुणे

MH13: सोलापूर

MH14: पिंपरी चिंचवड

MH15: नाशिक शहर

MH16: अहमदनगर

MH17: श्रीरामपूर - अहमदनगर

MH18: धुळे

MH19: जळगाव

MH20: औरंगाबाद

MH21: जालना

MH22: परभणी

MH23: बीड

MH24: लातूर

MH25: उस्मानाबाद

MH26: नांदेड

MH27: अमरावती

MH28: बुलढाणा

MH29: यवतमाळ

MH30: अकोला

MH31: नागपूर

MH32: वर्धा

MH33: गडचिरोली

MH34: चंद्रपूर

MH35: गोंदिया

MH36: भंडारा

MH37: वाशिम

MH38: हिंगोली

MH39: नंदुरबार

MH40: नागपूर ग्रामीण

MH41: मालेगाव

MH42: बारामती

MH43: वाशी - नवी मुंबई

MH44: अंबाजोगाई

MH45: अकलूज

MH46: पनवेल - खोपोली

MH47: मालवणी

MH48: वसई-विरार

MH49: नागपूर पूर्व

MH50: कराड

MH51: नाशिक ग्रामीण

MH52: परभणी ग्रामीण

MH53: पुणे दक्षिण

MH54: पुणे उत्तर

MH55: उदगीर

MH56: खामगाव - बुलढाणा

MH57: वैजापूर - छत्रपती संभाजीनगर

MH58: मीरा-भाईंदर