Indian Railways | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

'मेक इन इंडिया' (Make in India) म्हणत भारता आता बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करुन देशी वस्तूंच्या निर्मितीवर भर देऊ लागला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैश्नव (Ashwini Vaishnaw) यांनीही अशीच एक घोषणा केली आहे. वैश्नव यांनी केलेल्या घोषणेनुसार भारत यापुढे रेल्वेची चाके आणि रुळ भारतातच बनवणार आहे. ते म्हणाले, भारता आता हाय स्पीड रेल्वे (High Speed Rail ) आणि हाय स्पीड रेल्वेची चाके (High Speed Wheel) विदेशातून आयात न करता भारतातच बनवणार आहे. आतापर्यंत या दोन्ही गोष्टी भारत आयातच करत होता. आगामी काळात भारत या गोष्टी केवळ स्वनिर्मितीच करणार नाही तर निर्यातही करेन, असेही वैश्नव म्हणाले.

अश्निवी वैश्नव यांनी आपल्या घोषणेत पुढे म्हटले की, याबाबत आजच एक टेंडर काढण्यात आले आहे. या नव्या एग्रीमेंटचे नावही 'मेक इन इंडिया व्हील एग्रीमेंट' असे आहे. 120kmph पेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या ट्रेनसाठी विशेष बनावटीची हायस्पीड चाके (High Speed Wheel) आवश्यक असतात. भारत आता ती भारतातच बनवणार आहे. (हेही वाचा, रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई; 43 लाख रुपयांची तिकिटे केली जप्त, 6 जणांना अटक)

भारत हाय स्पीड रेल्वेची चाके आणि रुळ 1960 पासून आयात करत आला आहे. भारताला भविष्यात अशा चाकांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. प्रामुख्याने LHB, वंदे भारत ( 400 का टारगेट) ट्रेनला या चाकांची अधिक गरज भासणार आहे. ट्रेंडरची पूर्ण प्रक्रिया पुढच्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल. भारताला प्रतिवर्ष 2 लाख Wheels ची गरज भासते. एक लाख SAIL कडून घेतील. बाकी नवा कारखान्यातून घेतली जातील. जो टेंडरच्या माध्यातून प्लांट लावला जाईल. दरम्यान, लवकरच एक प्लांट लावयाच आहे. प्लांटमध्ये गुंतवणूक करणारी कंपनी 80 हजार व्हील, ज्याची वार्षीक किंमत साधारण 600 कोटी इतकी असते. पुढच्या 18 महिन्यात कारखाना उभारुन उत्पादन सुरु करण्याची योजना असल्याचेही वैश्नव म्हणाले.