मध्य प्रदेश: 10 वर्षाच्या मुलाने अवघ्या 30 सेकंदात बँकेतून चोरली तब्बल 10 लाख रुपयांची रोकड
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नीमच जिल्ह्यात सर्वांच्या भुवया उंचावल्या जातील अशी एक घटना घडली आहे. ती म्हणजे एका 10 वर्षाच्या मुलाने तब्बल 10 लाखांची रोकड बँकेतून पळवली आहे. या मुलाला ही रक्कम पळवण्यासाठी अवघे 30 सेकंद लागले आहेत. ऐवढेच नाही तर मुलाने रोकड पळवली याची खबर ही बँकेतील कर्मचारी किंवा तेथे उपस्थित असलेल्या लोकांना लागली नाही. या प्रकरणाचा खुलासा बँकेत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून झाला आहे.(Dr.Babasaheb Ambedkar Statue Desecrated: गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील सिहोर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना)

सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये असे दिसून आले की, एक 10 वर्षीय मुलगा सहकारी बँकेत सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास आला आहे. तेथे आल्यावर बँकेतील कॅशियरच्या रुममध्ये येतो खरा पण काउंटरवर उभ्या असलेल्या लोकांचे त्याच्याकडे लक्ष सुद्धा जात नाही. या मुलाला लपण्यासाठी काउंटरचा डेस्क पुरेसा होता. यानंतर हा मुलगा हळूचपणे काही नोटा त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये टाकल्यानंतर बँकेच्या बाहेर जातो. हे सर्व करण्यासाठी मुलाला फक्त 30 सेकंदाचा कालावधी लागल्याचे समजल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.(Air India च्या कर्मचाऱ्यांना झटका; कंपनी निवडक लोकांना विना पगार पाच वर्षांपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवणार) 

मुलगा पैसे चोरी करुन जसा पळ काढतो त्यावेळी बँकेचा अलार्म वाजतो. बँकेतून बाहेर पडलेला मुलगा पळत असल्याचे दिसून आल्यानंतर बँक गार्ड त्याच्या पाठी धावण्यास सुरुवात करतो. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 20 वर्षाचा एक मुलगा या लहान मुलाला मार्गदर्शन करत असल्याचे दिसून आले आहे. हा तरुण 30 मिनिटे बँकेत असल्याचे ही दिसले आहे. जसे या तरुणाने पाहिले कॅशिअर त्याच्या जागेवरुन उठून दुसरीकडे जातो त्यावेळी लहान मुलाला इशारा करतो. यावर बाहेर उभा असलेला मुलगा आतमध्ये येत काउंटरवर ठेवलेल्या नोटा घेऊन पळाला.

नीमज जिल्ह्याचे एसपी मनोज राय यांनी असे म्हटले आहे की, चोरी करणारा मुलगा अल्पवयीन असल्याने कॅश काउंटरच्या येथे उपस्थितीत असलेल्या लोकांना तो पैसे चोरी करताना दिसला नाही. फोरेंसिक विशेषज्ञांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज मधून असे ही दिसले की, पुरुष आणि मुलगा हे दोघे विरुद्ध दिशेला पळत होते. पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, कोणत्यातरी एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी बँकेची रेकी करत अल्पवयीन मुलाला चोरी करण्यासाठी पाठवले होते.