File Image | Dr BR Ambedkar (Photo Credits: Wikipedia Commons)

संपूर्ण भारत कोरोना विषाणूशी लढत असताना गुजरात (Gujarat) येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरातच्या भावनगर (Bhavnagar) जिल्ह्याती सिहोर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. याप्रकरणी सिहोर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहेत. ज्यामुळे संपूर्ण परिसरात असंतोष निर्माण झाला आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणींनीही जोर धरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करत असतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

सोमवारी काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा चेहरा बादलीने झाकला होता. तसेच पुतळ्याच्या शेजारी दारूच्या रिकाम्या बाटल्या ठेवल्याचा प्रकार पुढे आला आहे. हे धक्कादायक कृत्य पाहिल्यानंतर आज सकाळी आसपासच्या लोकांनी सिहोर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री ते सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. सिहोर पोलिसांकडून अज्ञात व्यक्तींविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. हे देखील वाचा- 'Rajgruha' Vandalism: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृह’च्या तोडफोड प्रकरणी उमेश जाधव या आरोपीस अटक; माटुंगा पोलिसांची माहिती

दरम्यान, स्थानिक लोकांनी पुतळ्या शेजारी ठेवण्यात आलेल्या रिकाम्या बाटल्या फेकून दिल्या आहेत. दरम्यान, स्थानिक पोलिसांकडून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. याआधी 7 जुलै रोजी मुंबईच्या दादर येथील हिंदू कॉलनीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह'ची, अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली होती.