देशभरात आज सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान (Lok Sabha Election 2024) सुरु आहे. एकूण 543 जागांपैकी आज पहिल्या टप्प्यात एकूण 102 जागांसाठी मदतान पार पडत आहे. जवळपास 22 राज्यांमध्ये हे मतदान होईल. दरम्यानच, आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा (Assemblies Election 2024) निवडणुकीसाठीही मतदान पार पडत आहे. सकाळी आठ वाजलेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. उल्लेखनीय असे की, ही निवडणूक सात टप्प्यांच्या निवडणूक प्रक्रियेच्या या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 102 जागांसाठी मतदान होणार आहे. आजच्या मतदानातील महत्त्वाचे 10 मुद्दे घ्या जाणून
लोकसभा मतदान पार पडत असलेली राज्ये
आसाम, महाराष्ट्र, बिहारसह तमिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, अंदमान आणि निकोबार बेटे, मिझोराम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम आणि लक्षद्वीपमधील जागांसाठी मतदान होईल. पश्चिम बंगाल, मणिपूर, त्रिपुरा, जम्मू आणि काश्मीर आणि छत्तीसगड. (हेही वाचा, Lok Sabha Election Phase 1 Voting: लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान; PM Modi यांच्याकडून मतदानाचं आवाहन)
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडत असलेली राज्ये
चार राज्ये - आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश - लोकसभेसह एकाच वेळी नवीन विधानसभा निवडतील. अरुणाचल प्रदेश (60 जागा) आणि सिक्कीम (32) मध्ये आज पहिल्यांदाच मतदान होत आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: ‘राज ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार असल्याच्या' चर्चांना राज ठाकरे यांनी लावला पूर्णविराम; पहा खुलासा!)
अब की बार.. क्या होगा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील प्रखर प्रचाराच्या पाठिंब्याने, भाजपने लोकसभेच्या 543 पैकी 370 जागांवर भरीव विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एनडीएने 400 जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे, मागील निवडणुकीत 353 जागा जिंकल्याच्या मागील यशाच्या आधारावर, भाजपने 303 जागा मिळवल्या होत्या. अब की बार ही भाजपची पंच लाईन आहे. त्यामुळे अब की बार क्या होगा? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
इंडिया आघाडी भक्कम
देशभरामध्ये भाजपप्रणित एनडीएला विरोध करण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' आघाडी स्थापन केली आहे. ज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये एकास एक उमेदवार देण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेमुळे विरोधकांना आयताच मुद्दा मिळाला आहे. त्यामुळे इंडिया आघाडी अधिक प्रखरतेने निविडणूक लढत आहे.
इंडया आघाडीत काहीशी बिघाडी
ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष भक्कम आहेत. त्या ठिकामी इंडिया आघाडीतील पक्षांनी काँग्रेसला कमी जागा दिल्या किंवा काही ठिकाणी दिल्याच नाहीत. जसे की, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने बंगाल आणि काही ईशान्येकडील राज्यांमध्ये काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने पंजाब आणि इतर प्रदेशांमध्ये काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत.
भाजपसमोर वर्चस्वाचे आव्हान
कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये लक्षणीय फायद्यावर लक्ष ठेवत ईशान्य, हिंदी हार्टलँड, जम्मू, गुजरात आणि बंगालमध्ये वर्चस्व राखण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.
काँग्रेसला पुनरागमनाची अपेक्षा
काँग्रेसला पुनरुत्थानाची अपेक्षा आहे. विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये, तेलंगणा आणि कर्नाटकमधील अलीकडील विजयांमुळे आणि प्रादेशिक पक्षांसोबतच्या युतीमुळे बळ मिळाले.
आजच्या लढतींमधील उल्लेखनीय उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल आणि प्रमुख नेते यांचा समावेश आहे, ज्यांनी 20 हून अधिक मतदारसंघांमध्ये तीव्र लढतीचे आश्वासन दिले आहे. 2019 च्या निवडणुकीत, UPA ने आज लढत असलेल्या 102 जागांपैकी 45 जागा जिंकल्या, तर NDA ने 41 जागा मिळवल्या. दरम्यान सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर येत्या 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.