LIC | (File Photo)

आधार कार्ड (Aadhar Card) हे सध्या महत्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे. खासकरुन आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी याची गरज भासते. आधार कार्डवरील 12 क्रमांक हे कर्मचारी भविष्य निधी (EPFO) खाते ते पॅन कार्ड सोबत लिंक करणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला आर्थिक देवाणघेवाण करताना समस्या येऊ शकतात. आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची अखेरची तारीख 30 जून आहे. मात्र आधार क्रमांक एलसीआयच्या पॉलिसी सोबत जोडणे अनिवार्य आहे. तर जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.

मनी9 नुसार, जर एखाद्या ग्राहकाला आधार कार्ड केवायसीच्या रुपात देऊ इच्छितो तर त्याला त्यासाठी परवानगी असणार आहे. दरम्यान आधार स्तंभ आणि आधार शिला सारख्या काही नितींसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. जर एखादा व्यक्ती या पॉलिसी खरेदी करु पाहत असेल तर त्याला आधार कार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे. कंचन दासगुप्ता यांनी मनी9 यांना म्हटले की, अन्य एलआयसी पॉलिसीच्या तुलनेत या पॉलिसींचे प्रिमियम अधिक कमी आहेत पण त्याचा लाभ अधिक आहे.(7th Pay Commission: पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी! गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने जारी केले नवे निर्देश)

-पॅन कार्डला आधार कार्ड 'या' पद्धतीने करा लिंक

>>पॅन कार्डला आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी प्रथम आयकर विभागाची अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्या.

>>येथे तुम्हाला Link Aadhar चा ऑप्शन दिसून येईल त्यावर क्लिक करा.

>>आता खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपला PAN Card क्रमांक, आधार क्रमांक आणि आपले नाव दाखल करा.

>>कॅप्चा कोड व्यवस्थिती बॉक्समध्ये भरा.

>>संपूर्ण माहिती दिल्यानंतर Link Aadhdar वर क्लिक करा.

दरम्यान, केंद्र सरकारने आधार कार्ड विमा पॉलिसीला लिंक करणे अनिवार्य केले होते. सप्टेंबर 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने सरकारच्या निर्णयाच्या विरोधात निर्णय सुनावला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार Irdai ने आपल्या नियमात बदल केले आहेत.