तुम्ही चारधाम यात्रा केली आहे का? विशेष म्हणजे बद्रीनाथ या तीर्थक्षेत्रास भेट दिली असेल तर जोशीमठ हे गाव तुमच्या नक्कीचं कायम स्मरणात असेल. बद्रीनाथ हे हिंदू धर्मातील प्राचिन प्रार्थना स्थळांपैकी एक आहे. साक्षात भगवान विष्णुंचा बद्रीनाथ येथे वास असल्याचं तुम्ही अनेक दंत कथेत किंवा भाविकांकडून ऐकलं असाल. तरी या बद्रीनाथ या देवस्थानाकडे जाण्याचं प्रवेशद्वार म्हणजेचं बद्रीनाथ. भारत-चीन सिमेवरील महत्वाचं गाव म्हणजे जोशीमठ.तरी जोशीमठ या गावाची चर्चे गेल्या काही दिवसांपासून फक्त पर्यटनासाठी किंवा सैनिकी कारवायासाठीचं नाही तर एक विचित्र पर्यावरणीय संकटामुळे चर्चेत आहे. जोशीमठ येथील शेकडो घरांना अचानक तडे गेल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. परिसरातील घरांमध्ये राहणाऱ्या 60 हून अधिक कुटुंबांना तात्पुरत्या मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच जोशीमठ या गावास आता भूस्खलन क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आले आहे.
तरी अचानक हे भुसखलन होण्यामागचं कारण काय, मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा हा एक लहान इशारा तर नाही ना अशा चर्चेंना उधाण आलं आहे. तरी या अचानक होणाऱ्या भुसखलनाबाबत तज्ञांच्या मतानुसार जोशीमठ येथील झालेल्या पर्यावरण रचनेतील मोठे बदल. तसेच हा एका दिवसांत घडलेला बदल नसुन मोठ्या काळापासून जोशीमठाच्या जमीनीतील पोटात काय सुरु आहे ह्याच्याकडे कुणाचं लक्षचं नाही. जोशीमठचा पुर्वीपासूनचं एक तुरळक वस्तीचं गाव आहे कारण मुळात जोशीमठ हे एका शतकापूर्वी भूकंपामुळे निर्माण झालेल्या भूस्खलनाच्या ढिगाऱ्यावर विकसित झालेले आहे. तरी कालांतराने लोकवस्ती, प्रदुषण, बांधकाम वाढत गेल्याने जोशीमठात हा अमुलाग्र बदल बघायला मिळत आहे. (हे ही वाचा:- Shocking Photos Of Sinking Joshimath: जोशीमठ 'सिंकिंग झोन' म्हणून घोषीत, खचणारी जमीन आणि भेगाळलेल्या भींती; पाहा धक्कादायक फोटो)
तरी जोशीमठातील शेकडो घरांना पडलेले तडे म्हणजे केदारनाथ प्रलयाची पुनरावृत्तीचं का अशी चर्चा होत आहे. तर हो जोशीमठाबाबत ही शक्यता नाकारता येणार नाही. मुळात नाजुकशा पृथ्वीच्या पृष्ठभागावर वसलेल्या गावात येणाऱ्या पर्यटकांची संख्या, कॉंक्रेटच्या इमारती, भलेमोठे रस्ते बांधल्या गेल्यामुळे येथील पर्यावरणाचं संतुलन बिघड्यामुळे असे मोठे बदल बघायला मिळाल्याचं तज्ञांचं मत आहे.