Largest Layoff 2023: केवळ 'Amazon', 'Google', 'मायक्रोसॉफ्ट'च नव्हे 'गोल्डमन सॅक्स', 'कॉईनबेस', 'झूम' यांसारख्या कंपन्यांनीही केली कर्माचरी कपात; जाणून घ्या टक्केवारीसह जागतिक आकडेवारी
Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

Layoff 2023: आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या जगभरातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात (Layoff) केली आहे. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी (Unemployment), महागाई (Inflation) वाढली. कंपन्यांनी अत्यंत वेगाने राबवलेली कर्मचारी कपात संभाव्य आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आतापर्यंत लक्षनीय पद्धीतने कर्मचारी कपातीचे धोरण राबविणाऱ्या काही कंपन्यांची नावे पुढे आली आहेत. जाणून घ्या पाठिमागील वर्षभरापासून सन 2023 पर्यंत कोणत्या कंपनीने किती कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले.

कपनी आणि कंपनीने कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या

Amazon: 27,000 कर्मचारी, Google: 12,000 कर्मचारी, मेटा: 10,000 कर्मचारी, मायक्रोसॉफ्ट: 10,000 कर्मचारी, गोल्डमन सॅक्स: 3,200 कर्मचारी, कॉईनबेस: 25% कर्मचारी, झूम: 15% कर्मचारी, Glassdoor: 15% कर्मचारी, ट्विलिओ: 15% कर्मचारी, Indeed: 15% कर्मचारी, LendingClub: 14% कर्मचारी, Vimeo: 11% कर्मचारी, Docusign: 10% कर्मचारी, सेल्सफोर्स: 10% कर्मचारी, Gemini: 10% कर्मचारी.

दरम्यान, नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात, मॅकडोनाल्ड्सने त्यांची कॉर्पोरेट कार्यालये बंद केली आहेत. कारण, मॅकडोनाल्ड्सने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. याशिवाय केवळ आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या सुमारे 330,000 लोकांना मागच्या वर्षभरात कामावरून टाकण्यात आले आहे. खास करुन आयटी क्षेत्रात टाळेबंदी सुरु होते की, काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा: दररोज 3000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत टेक कंपन्या; जानेवारीमध्ये 65 हजारांहून अधिक लोकांनी गमावल्या नोकऱ्या)

लेऑफ (टाळेबंदी) म्हणजे कर्मचार्‍याच्या नोकरीपासून तात्पुरते किंवा कायमचे वेगळे होणे, विशेषत: कर्मचार्‍यांच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे. आर्थिक मंदी, कंपनीची पुनर्रचना, विलीनीकरण आणि अधिग्रहण, तांत्रिक बदल किंवा कार्यप्रदर्शन समस्या यांसारख्या विविध कारणांमुळे टाळेबंदी होऊ शकते. टाळेबंदी दरम्यान, एखाद्या कर्मचाऱ्याला नोटीस दिली जाऊ शकते आणि त्याच्या रोजगाराच्या करारावर किंवा स्थानिक कामगार कायद्यांनुसार, त्याला विच्छेदन वेतन किंवा इतर फायदे मिळू शकतात. विशिष्ट परिस्थितीनुसार काढून टाकण्याचा कालावधी आणि तीव्रता बदलू शकते आणि एकल कर्मचारी किंवा संपूर्ण विभाग किंवा कंपनी प्रभावित करू शकते.

ट्विट

कर्मचाऱ्यांसाठी टाळेबंदी हा एक कठीण आणि तणावपूर्ण अनुभव असू शकतो. कारण ते त्यांचे उत्पन्न आणि स्थिरता गमावू शकतात. तथापि, कंपनीच्या आर्थिक आरोग्यासाठी आणि व्यवहार्यतेसाठी टाळेबंदी देखील आवश्यक असू शकते. नियोक्ते आणि कर्मचारी दोघांनीही टाळेबंदीमागील कारणे समजून घेणे आणि प्रक्रिया संवेदनशीलतेने आणि आदराने हाताळणे महत्त्वाचे आहे.