सिनियर सीटीझन्सना त्यांना वृद्ध काळात आराम आणि अन्य सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा असते. कारण वृद्ध वयात व्यक्तींना अवजड कामे करणे फारच मुश्किलीची असण्यासोबत आरोग्याची काळजी सुद्धा घेणे तितकेच महत्वाचे असते. गेल्या काही वर्षांपासून राजकरणी नेत्यांकडून सिनियर सीटीझन्ससाठी विविध योजना उपलब्ध करुन दिल्या जातात. याचा फायदा राजकरणी नेत्यांना मतांसाठी आणि वृद्धांना त्यांच्या आरोग्यासाठी होतो. तर सरकारच्या अशा काही योजना आहेत ज्या सिनियर सीटिझन्ससाठी कामी येतील. त्यामुळे वृद्ध काळात पैशांसंबंधित कोणतीही अडचण आल्यास तुम्ही या योजनेअंतर्गत त्याचा फायदा घेऊ शकता.
-प्रधानमंत्री वय वंदना योजना
वरिष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली या योजनेत गुंतवणूक केल्यास रक्कमेची सीमा दुप्पट केली आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षीय किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना गुंतवणूक करता येणार आहे. योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 ठेवण्यात आली आहे. त्याचसोबत गुंतवणूक करणाऱ्या सिनीटर सीटिझन्सना 8 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाणार आहे.
-पेन्शन योजना
पेन्शन योजनेनुसार सीनियर सीटिझन्सना मासिक, त्रैमासिक किंवा सहा महिन्यांनी वर्षभराच्या ठेवीसाठीचे व्याज दिले जाते. यामध्ये गुंतवणूक केलेली रक्कम अधिक असल्यास जेष्ठ नागरिकांना 10 हजार रुपयापर्यंत मासिक पेन्शन मिळते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार मार्च 2018 पर्यंत एकूण 2.23 लाख जेष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
-सिनियर सीटिझन्स सेविंग्स स्किम
या योजनेअंतर्गत 60 वर्षावरील व्यक्तींना गुंतवणूक करता येते. हे खाते सिंगल किंवा संयुक्त खाते स्वरुपात सुरु करता येते. पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत सिनियर सीटिझन्स सेविंग्स स्किम सुरु करता येते. या खात्यामध्ये 15 लाखापर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा आहे.(रेल्वेमध्ये तृतीयपंथीयांना आरक्षण लागू, रेल्वे प्रशासनाचा निर्णय)