
रेल्वे प्रवासाठी प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. खासकरुन वयोवृद्ध आणि अपंगांनासुद्धा प्रवासासाठी सवलत दिली जाते. त्यात आता तृतीयपंथीयांना ही सवलत देणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून जेष्ठ नागरिक पुरुष यांना 40 टक्के तर महिलांना 50 टक्के प्रवासासाठी सवलत दिली जाते. मात्र तृतीयपंथीयांना ही आता रेल्वे प्रवासामध्ये आरक्षण मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा- मार्च 2019 पर्यंत सुरु होणार मुंबई - पुणे Helicopter Taxi; इथे करू शकाल बुकिंग)
तसेच तृतीयपंथीयांना सध्या विविध सोईसुविधांचा लाभ घेता येतील अशा योजना सुरु करण्यात आल्या आहेत. तर रेल्वेमध्ये मिळणाऱ्या सवलतीसाठी 60 वर्षावरील तृतीयपंथीयांना 40 टक्के प्रवास सलवत मिळणार आहे.