Anannyah Kumari Alex: केरळमधील पहिली Transgender RJ अनन्या कुमारी एलेक्स हिचा मृत्यू, फ्लॅटमध्ये संशयास्पद स्थितीत सापडला मृतदेह
Ananya Kumari Alex | (Photo Credits-Instagram)

विधानसभा निवडणूक 2021 (Assembly Election 2021) मध्ये उमेदवारी केलेली केरळ राज्यातील पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी (Transgender RJ) अनन्या कुमारी एलेक्स (Ananya Kumari Alex) हिचा मृत्यू झाला आहे. कोच्ची येथील एका फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आरजे अनन्या (RJ Ananya Kumari Alex) हिने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, परंतू लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने अनेकांनी या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली आहे. पोलीस मृत्यूचे कारण शोधत आहेत.

रेडिओ जॉकी अनन्या कुमारी एलेक्सहिने पाठीमागील वर्षी जून महिन्यात सेक्स रिसायमेंट सर्जरी (Sex Reassignment Surgery) केली होती. त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक समस्या उद्भवल्या होत्या. या समस्यांनंतर अनन्या हिने तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि खासगी रुग्णालयांवर निष्काळजीपणाचा आरोप केला होता. या प्रकरणी अनन्या हिने पोलिसांमध्ये तक्रारही केली होती. तिने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, सर्जरी झाल्यानंतर तिला गंभीर स्वरुपाच्या शारीरीक वेदना होत आहेत. तसेच, तिला विविध प्रकारची कामे करण्यावरही मर्यादा येत आहेत. आपली फसवणूक झाल्याचे सांगत न्याय मिळावी अशी मागणी अनन्याने केली होती. (हेही वाचा, Suyash Tilak Engagement Photos: अभिनेता सुयश टिळक ने लेडी लव्ह आयुषी भावे सोबत केला साखरपुडा; इथे पहा फोटोज)

अनन्या कुमारी एलेक्स हिने केरळ विधानसभा निवडणूक 2021 मध्ये मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगरा विधानसभा मतदारसंघातून इंडियन यूनियन मुस्लिम लीग (आईयूएमएल) पक्षासाठी निवडणूक लढवली होती. तिने पीके कुंजालिकुट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी केली होती. तसेच, विधानसभा निवडणूक लढवणारी ती पहिली महिला उमेदवारही ठरली होती. दरम्यान, मतदानाच्या एक दिवस आगोदर तिने आपली निवडणूक मोहीम स्थगित केली होती. त्या वेळी तिने आरोप केला होता की आपल्याला धमकावले जात आहे. तसेच, आपल्याच पक्षाच्या नेत्यांकडून जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे.