Nihap Virus in India: केरळ (Kerala) राज्यात निपाह विषाणू डोके वर काढत असल्याचे प्राथमिक चित्र आहे. धक्कादायक म्हणजे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) द्वारा देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा विषाणू COVID-19 पेक्षाही गंभीर आहे. कारण कोणाच्या तुनेलत याचा मृत्यूदर अधिक आहे. ICMR डीजी डॉ राजीव बहल यांनी माहिती देताना शुक्रवारी सांगितले की, निपाहचा मृत्यू दर कोविडच्या तुलनेत सुमारे 60% अधिक असल्याचे त्यांच्या पाहणी अहवालात पुढे आले आहे. महामारीच्या काळात कोविड-19 संसर्गामुळे होणारा मृत्यूदर अवघा 03% इतका होता.
कोविडच्या तुलनेत निपाह संक्रमित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असून ते 40 ते 70 टक्के दरम्यान असल्याचेही आयसीएमआरने म्हटले आहे. जे आगोदर जे 2-3 टक्के इतके होते. आयसीएमआरने माहिती देताना पुढे म्हटले आहे की, त्यांना ऑस्ट्रेलियाकडून सन 20189 मध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीचे काही डोस मिळाले आहेत. सध्या हे डोस फक्त 10 रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर, भारताबाहेर निपाह विषाणूची लागण झालेल्या 14 रुग्णांना मोनोक्लोनल अँटीबॉडी देण्यात आली आहे. अँटीबॉडी देण्यात आलेले ते सर्वजण सुरक्षीत आहेत.
डॉ. राजीव बहल यांनी भर देत सांगितले की, केरळमधील निपाह विषाणूची सध्याची सर्व प्रकरणे एका इंडेक्स रुग्णाच्या संपर्कात आहेत आणि निपाहचा उद्रेक रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निपाह व्हायरसच्या पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली असून केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील 39 वर्षीय व्यक्ती या विषाणूचा अलिकडेच बळी ठरला आहे. केंद्र सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) मधून एक प्रगत टीम केरळमधील कोझिकोडला पाठवली आहे. या टीममध्ये ऑन-साइट चाचणी आयोजित करण्यासाठी BSL-3 प्रयोगशाळांसह सुसज्ज असलेल्या मोबाईल युनिट्सचा समावेश आहे. या उद्रेकाला तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याला मदत करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डॉ. माला छाब्रा यांच्या नेतृत्वाखाली एका गटाची नियुक्ती केली आहे.
निपाह विषाणूच्या संसर्गाच्या सतर्कतेमुळे शेजारील कर्नाटकने केरळच्या प्रभावित भागात लोकांना प्रवास न करण्याची सूचना देणारा सल्लागार जारी करण्यास सांगितले आहे. कोरोना काळातही निपाह विषाणूची प्रकरणे पुढे आली होती. मात्र, त्या वेळी ती तितक्या मोठ्या प्रमाणात नव्हती, जेवढी आता त्याची चर्चा होती आहे.