कर्नाटक मध्ये मानसिक आजारातून एका व्यक्तीने गिळली होती 187 नाणी; डॉक्टरही आवाक
Coins | PC: Twitter/ANI

कर्नाटक मधील Bagalkot भागामध्ये एका व्यक्तीच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क 187 कॉईन्स काढली आहेत. दरम्यान ANI वृत्तसंस्थेच्या रिपोर्ट्सनुसार, हा व्यक्ती उलटी आणि पोटात बिघाड झाल्याची तक्रार घेऊन आला होता. त्यानंतर वैद्यकीय तपास आणि शस्त्रक्रियेमधून या व्यक्तीच्या पोटातून चक्क 187 कॉईन्स निघाली आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार हा एक मानसिक रूग्ण असून मनोविकारातून तो कॉईन्स तोंडात टाकत होता.

कर्नाटक मधील Hanagal Shree Kumareshwar Hospital and Research Centre मध्ये रूग्णावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. रूग्णाला उलटीचा त्रास आणि पोटात बिघाड जाणवत होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात त्याने मानसिक आजारातून ही सारी नाणी गिळली होती. रूग्णाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. 2 तासांच्या दीर्घ शस्त्रक्रियेनंतर सारी नाणी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सारी नाणी टेबल वर मांडली होती. हे देखील नक्की वाचा: तामिळनाडू: 13 वर्षाच्या मुलीच्या पोटात सापडले अर्धा किलो केस आणि शॅम्पूची पाकिटं.

पहा ट्वीट

Dr Eshwar Kalaburgi,या शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया देताना रूग्ण मागील 2-3 महिने एका मानसिक आजारातून जात असताना ही सारी नाणी गिळली असल्याचं म्हटलं आहे. सार्‍या नाण्यांचं वजन अंदाजे 1.5 किलो आहे. तर सर्जनला ती बाहेर काढण्यासाठी अंदाजे 2 तासांची शस्त्रक्रिया करावी लागली आहे. Shocking! व्यक्तीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून बाहेर काढली 63 नाणी; ढीग पाहून डॉक्टरही थक्क .

दरम्यान Raichur मधील Lingsugur गावामधील रहिवासी असलेला हा रूग्ण Dyamappa Harijan नामक व्यक्ती आहे.