Shocking! व्यक्तीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून बाहेर काढली 63 नाणी; ढीग पाहून डॉक्टरही थक्क
Coins inside man's stomach (Credits: Twitter)

डॉक्टरांना पृथ्वीवरील देव म्हटले जाते. अनेक गुंतागुंतीची प्रकरणे हाताळून डॉक्टरच रुग्णांना नवजीवन देतात. अनेक किचकट ऑपरेशन्सबद्दल तुम्ही विचित्र केसेस ऐकल्या असतील. आता याच धर्तीवर आम्ही तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या केसबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूर जिल्ह्यात ही विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका 36 वर्षीय व्यक्तीने प्रत्येकी एक रुपयाची अशी 63 नाणी (Coin) गिळली होती. पोटात वेदना होत असल्याची तक्रार घेऊन जेव्हा तो रुग्णालयात पोहोचला तेव्हा ही गोष्ट समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, चौपासनी हाऊसिंग बोर्ड येथे राहणाऱ्या 36 वर्षीय तरुणाला पोटदुखीची तक्रार होती. सायंकाळी चार वाजता कुटुंबीयांनी त्यांना मथुरादास माथूर रुग्णालयात नेले. त्यानंतर डॉक्टरांनी तरुणाला रुग्णालयात भरती करून घेतले. एक्स-रे काढल्यावर डॉक्टरांना धक्काच बसला. रुग्णाच्या पोटात नाण्यांचा ढीग दिसला. डॉक्टरांनी रुग्णाकडे विचारपूस केली असता त्याने नाणी गिळल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तरुणाच्या पोटातून नाण्यांचा ढीग काढला. हा तरुण मतिमंद आहे.

एमडीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने दोन दिवसांच्या ऑपरेशनमध्ये, एंडोस्कोपिक प्रक्रियेच्या मदतीने या व्यक्तीच्या पोटातून नाणी काढली. माध्यमांशी बोलताना एचओडी (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) नरेंद्र भार्गव यांनी सांगितले की, पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या तरुणाचा एक्स-रे केला असता, नैराश्याच्या अवस्थेत त्याने दोन दिवसांमध्ये 1 रुपयाची 63 नाणी गिळल्याचे दिसून आले. (हेही वाचा: Rajasthan: बायकोला मित्रासोबत पाहून नवऱ्याचा फिरला माथा, झाडाला बांधून केली बेदम मारहाण)

दरम्यान, सध्या या तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, भार्गव यांनी त्या व्यक्तीला मानसिक उपचारांची शिफारस केली आहे, कारण त्याला नैराश्याच्या अवस्थेत वस्तू गिळण्याची सवय आहे. याआधी राजस्थानच जून 2019 मध्ये असेच एक प्रकरण समोर आले होते, जिथे 24 वर्षीय गजेंद्रच्या पोटावर शस्त्रक्रिया करून 50 प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या होत्या.