तामिळनाडू: 13 वर्षाच्या मुलीच्या पोटात सापडले अर्धा किलो केस आणि शॅम्पूची पाकिटं
Representational image. (Photo Credits: sasint/pixabay)

तामिळनाडूमधील (Tamil Nadu) कोइंबतूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 13 वर्षांच्या मुलीच्या पोटात अनेक दिवसांपासून दुखत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या मुलीची तपासणी करण्यात आल्यानंतर या मुलीच्या पोटातून चक्क अर्धा किलो (500 ग्रॅम) केस आणि शॅम्पूची पाकिटं आढळली आहेत. हा सर्व प्रकार पाहून मुलीचे कुटुंब आणि डॉक्टर्स चकीत झाले आहेत.

ही मुलगी इयत्ता सातवीत शिकत असून तिला नेहमीच पोटदुखीचा त्रास होतो. या मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मुलीला नेहमी पोटदुखीचा त्रास होतो. एक दिवस तिच्या पोटात अतिशय वेदना होऊ लागल्या. त्यामुळे आम्ही तिला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी करून ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर मुलीच्या पोटात अर्धा किलो केस आणि शॅम्पूची रिकामी पाकिटं सापडली, असंही त्यांनी सांगितलं. (हेही वाचा - भंडारा: वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणाने घेतले मेल्याचे सोंग; पहा व्हायरल व्हिडिओ)

डॉक्टरांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. मुलीच्या पोटात ऐवढे केस गेलेचं कसे? असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. डॉक्टरांना हे ऑपरेशन करण्यासाठी सुमारे 1 ते 1.30 तास लागले. या मुलीच्या जवळच्या मित्राच्या निधनामुळे ती नैराश्य अवस्थेत गेली. त्यामुळे तिच्या मानसिक स्थितीत बदल झाले. यामुळे तिने शॅम्पू आणि केसांचे रिक्त पाकिटं खाण्यास सुरुवात केली. मात्र, डॉक्टरांनी या मुलीवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली आहे. सध्या सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होत आहे.