भंडारा: वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणाने घेतले मेल्याचे सोंग; पहा व्हायरल व्हिडिओ
(Photo Credits: Video Screengrab/ @ParveenKaswan/ Twitter)

सोशल मीडियावर सध्या एका वाघाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणाने मृत्यूचे सोंग करत आपला जीव वाचवला आहे. हा व्हिडिओ भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या तुमसर (Tumsar) तालुक्यातील बिनाखी (Binakhi) गावातील आहे. वाघाच्या या हल्ल्यात 3 जण जखमी झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये वाघ चक्क एका तरुणाच्या अंगावर बसला आहे. परंतु, या तरुणाने मृत्यूचे नाटक करत आपली सुटका केली आहे. या वाघाला पळवून लावण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. अखेर गावकऱ्यांना या वाघाला पळवून लावण्यात यश आलं. मात्र, या घटनेमुळे बिनाखी गावातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. (हेही वाचा - ग्राहकाच्या पिझ्झावर थुंकला डिलीवरी बॉय, होऊ शकते 18 वर्षे कारागृहाची शिक्षा, तुर्की येथील घटना)

काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या पथकाने वाघाला पळवून लावले होते. पंरतु, मागील आठवड्यात गावकऱ्यांना पुन्हा वाघाचे दर्शन झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी गर्दी करून वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. छोटेलाल ठाकरे, शंकरलाल तुरकर आणि विजय शहारे अशी जखमींची नावे आहेत.