कर्नाटक: विद्यार्थ्याने परीक्षेत उत्तराऐवजी लिहिले, 'PUBG गेम डाऊनलोड करण्याची आणि खेळण्याची पद्धत'
Archived, edited, representative images | (Photo Credits: File Photo)

PUBG Addiction: पबजी गेमची (PUBG Game) क्रेझ, व्यसन अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पजबी गेममुळे होणारा त्रास, दुष्परिणाम, गुन्हे, आत्महत्या अशा अनेक बातम्या समोर येत असताना अजून एक घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील (Karnataka) एका विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या परीक्षेत उत्तरांऐवजी पबजी गेम कसा डाऊनलोड करावा आणि कसा खेळावा यासंबंधी माहिती लिहिली.

पबजी गेमचे वेड लागण्यापूर्वी हा विद्यार्थी अत्यंत हुशार होता. परंतु, पबजी गेमच्या वेड त्याच्या अपयशाचे कारण ठरले, अशी कबुली खुद्द त्या मुलाने दिली.  हुशार असूनही पबजी गेमच्या व्यसनामुळे अभ्यासात मागे पडलो, असल्याचे त्याने सांगितले. सुरत शहरात 'पबजी गेम'वर बंदी; असा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे ठरले भारतातील पहिले शहर

या विद्यार्थ्यांची उत्तर प्रत्रिका तपासत असलेल्या शिक्षकांनी हे प्रकरण समोर आणले. उत्तरप्रत्रिका वाचल्यानंतर संबंधित शिक्षकांनी मुख्यध्यापकांची भेट घेत हे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर या मुलाच्या पालकांशी चर्चा करण्याचे मुख्यध्यापकांनी आणि शिक्षकांनी ठरवले. त्यानंतर मुलाच्या पालकांनी गेमच्या व्यसनाचे दुष्परिणाम लक्षात आणून देत त्याचा मोबाईल काढून घेतला. मात्र त्यावर मी गेम खेळणे मीस करतो, पण मला माझी चूक लक्षात आली असल्याचे मुलाने म्हटले आहे. पबजी गेम खेळण्याच्या नादात तरुण अॅसिड प्यायला; प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु

या सर्व प्रकरणावर शिक्षकांनी सांगितले की, "यापूर्वी विद्यार्थी उत्तरे माहिती नसल्यावर उत्तर प्रत्रिकेत सिनेमाची गाणी, डायलॉग्स लिहीत होती, पण प्रथम विद्यार्थ्याने पबजी गेमविषयी लिहिले."

सध्या देशभरात लहान आणि तरुण मुलांमध्ये पबजीची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. असेच व्यसन जर तुमच्या मुला/मुलींना लागले असेल तर त्याकडे वेळीच लक्ष द्या आणि मुलांना या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी योग्य ती मदत करा.