ऑनलाईन बॉटल रॉयल गेम पबजी (PUBG) चे वाढते प्रस्थ सर्वश्रूत आहे. या गेमची क्रेझ कोणत्याही वयोगटापर्यंत मर्यादीत राहिलेली नाही तर सर्वच या गेमचे चाहते झाले आहेत. मात्र या गेमचे व्यसन सर्वाधिक तरुणाईत दिसून येते. हे व्यसन कधी स्वतःच्या जीवावर उठते तर कधी नातेवाईक, आजूबाजूची मंडळी यांच्यासाठी त्रासदायक ठरते. या गेममुळे घडणाऱ्या दुर्घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पबजी गेमचे व्यसन या चर्चेचा विषय ठरत आहे. Pubg Game खेळू दिला नाही, विद्यार्थ्याने सोडले घर, मारली नदीत उडी
विविध कार्यक्रमात राज्य सरकारकडून या गेमच्या व्यसनावर टीका केली जाते. यावर बंदी घालण्याची मागणी केली जाते. तरुणाईला वेड लावणाऱ्या या गेमवर आता सुरत शहरात बंदी घालण्यात येणार आहे. असा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे गुजरतमधील सुरत हे पहिले शहर ठरत आहे. लहान मुले आणि तरुणाई यांना लागलेले पबजीचे व्यसन, त्यामुळे मनावर होणारा परिणाम आणि घडणाऱ्या दुर्घटना यामुळे पबजीवर बंदी घातली जात आहे. तसंच पबजी गेमच्या व्यसनामुळे मुलांचे अभ्यासाकडेही दुर्लक्ष होत आहे. पबजी गेम खेळण्याच्या नादात तरुण अॅसीड प्यायला; प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु
9 मार्चपासून सुरत शहरात पबजी गेमवर बंदी घालण्यात येणार आहे. यासंदर्भातील एक पत्रक जारी करण्यात आले आहे. हे पत्रक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.
गुजरातच्या बाल अधिकार संस्थेच्या अध्यक्षांनी देखील, खेळांच्या नकारात्मक परिणामांना विरोध करणारे परिपत्रक राष्ट्रीय राज्याच्या बाल अधिकार संरक्षण (एनसीपीसीआर) कडे पाठविले आहे.
मात्र या गेमवर नेमकी बंदी कशी घालणार, यावर राज्य सरकारने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या सर्व प्रकरणात शैक्षणिक संस्थांनी मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. त्याचबरोबर पालकांना पबजी गेम आणि त्याचे परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.