Kannada Signboards in Karnataka: कर्नाटकात पुन्हा एकदा भाषा वाद; आंदोलकांनी तोडले इंग्रजी भाषेतील फलक, जाणून घ्या सविस्तर
Representational Image (Photo Credits: PTI)

Kannada Signboards in Karnataka: कर्नाटकात (Karnataka) पुन्हा एकदा भाषेचा वाद (Language Debate) सुरू झाला. बेंगळुरू नागरी संस्थेच्या ताज्या निर्देशानुसार, दुकानांना त्यांच्या साइनबोर्डवर किमान 60 टक्के कन्नड भाषा (Kannada Signboards) असल्याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकात हिंदी विरुद्ध कन्नड वाद पुन्हा चर्चेत आला आहे. ब्रुहत बेंगळुरू महानगरपालिकेचे मुख्य आयुक्त तुषार गिरी नाथ यांनी म्हटले आहे की, नागरी संस्थेच्या अखत्यारीतील व्यावसायिक स्टोअरने साइनबोर्ड आदेशाचे पालन केले नाही तर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

दुकानाच्या नावाच्या फलकांवर 60 टक्के कन्नड भाषा वापरण्याच्या बेंगळुरू महानगरपालिकेच्या निर्देशानंतर, बुधवारी, अनेक कन्नड समर्थक गटांनी रस्त्यावर निदर्शने केली आणि इंग्रजीमध्ये लिहिलेल्या साइनबोर्डसह दुकानाच्या फलकांचे नुकसान केले. विशेष म्हणजे याआधी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही कर्नाटकात राहणाऱ्या लोकांना कन्नड शिकण्याचा सल्ला दिला होता.

राजधानी बेंगळुरूमध्ये बुधवारी अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. आंदोलकांनी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सलून आणि स्पासह शहरातील अनेक आस्थापनांना लक्ष्य केले. आंदोलनाशी संबंधित अनेक व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये आंदोलक इंग्रजीत लिहिलेले फलक फाडताना दिसत आहेत. यावेळी इंग्रजी सूचना फलकांना काळा रंग फासण्यात आला.

60 टक्के कन्नड भाषेशी संबंधित आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रुहत बेंगळुरू महानगरपालिकेचे प्रमुख तुषार गिरी नाथ म्हणाले की, बीबीएमपी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या दुकाने आणि मोठ्या आस्थापनांना त्यांचे फलक बदलण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत त्यांनी आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच परवानाही रद्द केला जाऊ शकतो. (हेही वाचा: Accident Caught On Camera In Karnataka: कर्नाटक बिदरमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या दोन वर्षाच्या मुलाला कारने चिरडले, भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, सीएम सिद्धरामय्या सतत कन्नड भाषेच्या वापराबाबत भाष्य करत आहेत. याआधीही त्यांच्या मागील कार्यकाळात बेंगळुरू मेट्रो स्थानकांची हिंदी नावे टेपने झाकण्यात आली होती. 'राज्यात राहणाऱ्या सर्व लोकांनी कन्नड बोलायला शिकले पाहिजे', असेही त्यांनी ऑक्टोबरमध्ये म्हटले होते.